cooperative society : अकोला तालुक्यातील २० सहकारी संस्था अंतिम अवसायनात

20-cooperative-societies-in-Akola-taluka-enter-final-liquidation : २५ मार्चला अवसायकांची सभा, आक्षेप नोंदवण्याची शेवटची संधी

Akola अकोला तालुक्यातील एकूण २० सहकारी संस्था अंतिम अवसायन प्रक्रियेत असून, या संदर्भात अवसायकांची सभा २५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. ही सभा अकोला तालुका सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालय, जिल्हा सहकारी भूविकास बँक, अकोला येथे आयोजित करण्यात आली आहे.
अवसायन प्रक्रियेबाबत कोणतेही स्पष्टीकरण, हरकत किंवा आक्षेप असल्यास संबंधितांनी सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन उपनिबंधक ज्योती मलिये यांनी केले आहे.

Ajit Pawar memorial : अजित पवार यांच्या नावाने संस्था-स्मारकांसाठी कुटुंबाची परवानगी बंधनकारक; गैरवापर टाळण्यासाठी नवा निर्णय

अंतिम अवसायन प्रक्रियेत समाविष्ट संस्थांमध्ये सार्थ मागास महिला औद्योगिक सहकारी संस्था, महिला कल्याणी औद्योगिक सहकारी संस्था, समृद्धी मागासवर्गीय गारमेंट व वस्त्रोद्योग सहकारी संस्था, माँ पद्मावती महिला औद्योगिक सहकारी संस्था, सुरभी अमरप्रीत गृहनिर्माण सहकारी संस्था, सिद्धीविनायक गृहनिर्माण सहकारी संस्था, रामेश्वर गृहनिर्माण सहकारी संस्था, नूतन खेमका गृहनिर्माण सहकारी संस्था, अकोला शहर मागास संस्था, मातोश्री सुशिक्षित बेरोजगार बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था, माऊली सुशिक्षित बेरोजगार बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था, सूर्योदय सुशिक्षित बेरोजगार बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था यांचा समावेश आहे.

Akola municipal corporation : अकोला महापालिकेतील ‘क्लब टेंडर’वरून वाद

तसेच बालाजी सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था, लक्ष अभिनव शेती विविध तंत्रज्ञान व संगोपन व समृद्धी सहकारी संस्था, अस्मिता अभिनव सहकारी संस्था, युवा सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, उन्नती अभिनव शेती विविध तंत्रज्ञान संगोपन व समृद्धी सहकारी संस्था, हरीसिद्धा सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था, गणपती बहुउद्देशीय बेरोजगार सेवा सहकारी संस्था, राष्ट्रतेज सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था यांचाही समावेश आहे.