Crime in Nagpur: नागपूरच्या किदवई हायस्कूलमध्ये खळबळ; मुख्याध्यापकाचा शिक्षकावर चाकूने हल्ला

​headmaster-attacked-teacher-with-knife-in-nagpur-kidwai-high-school : ​३० हजारांच्या ‘कमिशन’वरून वाद; अल्पसंख्याक शाळांमधील आर्थिक शोषणाचे धक्कादायक वास्तव

Nagpur ​नागपूरमधील शिक्षण क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. उत्तर नागपुरातील काशीनगर भागात असलेल्या किदवई हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये चक्क मुख्याध्यापकानेच आपल्या सहकारी शिक्षकावर चाकूने प्राणघातक हल्ला केला.

या जीवघेण्या हल्ल्यात शिक्षक सगीर अहमद हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने मेडिकल रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून शाळांमधील अंतर्गत वादाचा हिंसक चेहरा समोर आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापक मजीब पठाण आणि मुतज्जिम खान यांनी मिळून सगीर अहमद यांच्यावर हा हल्ला केला. या वादामागे आर्थिक शोषणाचे गंभीर कारण असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

Farmers Suicide : सावकारीच्या जाचाने शेतकऱ्याचा बळी, दीड लाखांच्या बदल्यात २० लाखांची मागणी

जखमी शिक्षक सगीर अहमद यांचा असा आरोप आहे की, मुख्याध्यापक त्यांच्या दरमहा वेतनातून जबरदस्तीने ३० हजार रुपये कापून घेत होते. मात्र, राज्यातील अल्पसंख्याक शाळांच्या दर्जाबाबत आणि तेथील गैरप्रकारांबाबत चौकशीचे आदेश सुटल्यानंतर अहमद यांनी ही रक्कम देण्यास नकार दिला होता. याच रागातून मुख्याध्यापकाने टोकाचे पाऊल उचलत त्यांच्यावर चाकूने हल्ला केला.

Chikhli APMC : चिखली बाजार समितीत शिंगणे-बोंद्रे गटाची ‘पकड’ कायम; श्रीकृष्ण धोंडगे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड

​या घटनेचे धागेदोरे थेट मंत्रालयातील वादग्रस्त निर्णयापर्यंत पोहोचले आहेत. काही काळापूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर जाहीर करण्यात आलेल्या दुखवट्याच्या काळात, मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी घाईघाईत ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच चौकशीचे आदेश दिले आहेत.

MSRTC NCMC : आणखी एक कार्ड! एसटी सवलतीच्या प्रवासासाठी हे कार्ड बंधनकारक

राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनीदेखील या प्रकरणाचा तीव्र निषेध केला असून, अनेक शाळा केवळ शिक्षकांचे आर्थिक शोषण करण्यासाठी अल्पसंख्याक दर्जा मिळवत असल्याचा दावा केला आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणी केली असून, किदवई हायस्कूलमधील या रक्तपाताने शाळांमधील ‘कमिशन’खोरीचे रॅकेट पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणले आहे.