‘Online Jagar’ in the background of literature conference : मराठी माणसांना कलागुणांचा व्हिडिओ शेअर करण्याची संधी
Amravati 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून देश-विदेशातील मराठी माणसांना आपल्या कलागुणांचा व्हिडिओ शेअर करण्याची संधी मिळणार आहे.
जर आपण कवी, लेखक, कलाकार, गायक असाल, तर आपल्या स्वरचित कवितेचा अथवा कलाकृतीचा एक सुंदर व्हिडिओ तयार करून पाठवू शकता. केवळ आपल्याच कविता नाही, तर इतर मान्यवर कवींच्या कवितांचे वाचनही करता येईल. तसेच, गझल वाचन, गायन, लोककला सादरीकरण, अभंग, पोवाडे, नाट्यछटा, लघुकथा, भारूड अशा विविध कलांच्या माध्यमातूनही सहभाग घेता येईल.
MP Balwant Wankhede : शेतकऱ्यांचे उत्पादन पोहोचेल थेट ग्राहकांपर्यंत
हा ऑनलाईन जागर म्हणजे मराठी भाषेच्या गौरवाचा उत्सव! त्यामुळे आपले शब्द आणि कलाकृती 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला संस्मरणीय बनवू शकतात.
आपले व्हिडिओ माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महासंवाद’ पोर्टलवर तसेच महासंचालनालयाच्या राज्यभरातील अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले जातील. dgiprdlo@gmail.com हा ई-मेल आयडी, तर 9892660933, 7504696786 हे व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे.
मराठी भाषेचा जागर करा!
महाराष्ट्राला समृद्ध साहित्यिक परंपरा लाभली आहे. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे मराठी भाषेच्या श्रीमंतीचा उत्सव! या संमेलनात आपले शब्द आणि कला गाजवा आणि मराठीचा अभिमान जागवा!