Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule : सीताबर्डी ते कोराडी… फडणवीस-बावनकुळे यांच्या मतदारसंघांत मेट्रो कनेक्टिव्हिटी

koradi-to-sitabuldi-cm-and-guardian-minister-constituency-link : १७०० कोटींचा आराखडा सादर; बुटीबोरी एमआयडीसीलाही मेट्रोचे वेध

Nagpur नागपूर मेट्रोचा विस्तार आता थेट शहराच्या वेशी ओलांडून ग्रामीण भागाकडे कूच करत आहे. मेट्रो रेल्वेच्या तिसऱ्या टप्प्याचा विकास आराखडा नुकताच समोर आला असून, यामध्ये राजकीय वर्तुळातील दोन बड्या नेत्यांच्या मतदारसंघांना जोडणारा ‘संवाद पूल’ बांधला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघातील भौगोलिक अंतर आता मेट्रोच्या गतीने कमी होणार असून, कोराडी ते सीताबर्डी या साडेअकरा किलोमीटरच्या मार्गाला प्राधान्य देण्यात आले आहे.

नागपूर मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यात कोराडी आणि बुटीबोरी या दोन महत्त्वाच्या केंद्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवासस्थान आणि प्रभाव क्षेत्र असलेल्या कोराडीला मेट्रोने जोडल्यामुळे या भागातील नागरिकांना थेट शहराच्या केंद्रस्थानी येणे सुलभ होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विकासाच्या व्हिजनमध्ये पालकमंत्र्यांनी आपल्या मतदारसंघाचा समावेश करून घेतल्याने या मार्गाचे काम आता वेग घेणार आहे.

Nitin Gadkari : ‘मुंबई-पुण्याला विसरून जा, आता विदर्भच देतोय नोकऱ्या’

बुटीबोरी येथील औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची अनेक वर्षांची मागणी आता पूर्णत्वास येत आहे. बुटीबोरी ते सीएट कंपनी या ३ किमीच्या विस्तारामुळे हजारो कामगारांचा प्रवास सुखकर होईल. मेट्रो रेल्वे आता शहराच्या इनर रिंगरोडवरून धावणार असून, यामुळे खापरी ते नवीन नागपूर (१५ किमी) असा मोठा पट्टा कव्हर केला जाणार आहे. १७०० कोटींच्या या प्रकल्पाचा फायदा थेट मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाला होणार आहे.

ZP Election Results : दिग्गज नेत्यांच्या पत्नी, कन्या आणि वारसांचा दबदबा!

प्रकल्पाच्या सुरुवातीला “हा निवडणुकीचा जुमला आहे” किंवा “पैशाची उधळपट्टी आहे” अशी टीका करणाऱ्या विरोधकांना प्रशासनाने कृतीतून उत्तर दिले आहे. पहिल्या दोन टप्प्यांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर आता तिसऱ्या टप्प्याचा आराखडा जाहीर करून नागपूर मेट्रोने आपला विस्तार केवळ शहरापुरता मर्यादित न ठेवता जिल्ह्याला जोडण्याचे संकेत दिले आहेत.