Chief Minister assures that farmers’ rightful water will be untouched : मुख्यमंत्र्यांचा शब्द, हिवरखेड येथील निवडणूक प्रचार सभेत आश्वासन
Akola वान धरणातील पाण्याचा वापर बाळापूर आणि शेगाव शहरासाठी करण्याची मागणी होत असली, तरी हे पाणी तेल्हारा, हिवरखेड आणि अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे असून ते इतर कोणा शहराला देण्याचा प्रश्नच नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हिवरखेड येथे नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, वान धरणातील पाणी पूर्वी जळगाव जामोद शहरानंतर अकोल्यासाठी आरक्षित करण्यात आले होते. मात्र, आता बाळापूर व शेगावसाठी पाणी आरक्षित करण्याची नवीन मागणी पुढे येत आहे. या मागणीमुळे अकोट, तेल्हारा व हिवरखेडमधील शेतकऱ्यांच्या पाण्यावर गदा येऊ शकते.
Chitra Wagh : महिलांना ‘खर्रा खाणाऱ्या’ म्हणणाऱ्या दोडक्या भावाला धडा शिकवा
तसेच आ. भारसाकळे यांनी नव्याने होणारे पाणी आरक्षण रद्द करण्याची मागणी केली. यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, “वान धरणातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी कुणालाही देणार नाही,” असे स्पष्टपणे आश्वस्त केले.
फडणवीस पुढे म्हणाले की— पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी बांधवांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारे अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. धरती आभा योजना ही आदिवासींच्या सर्वांगीण विकासाला नवसंजीवनी देणारी आहे.
Local Body Elections : रवी राणांचा हात पुन्हा ‘भाजप के साथ’!
सातपुडा परिसरात नवे रस्ते, रेल्वे मार्ग विस्तारीकरण, व्याघ्र प्रकल्प पर्यटन व बाजारपेठेचे सक्षमीकरण या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. हिवरखेड परिसरातील ५०० कोटी रुपये खर्चाच्या सौरऊर्जा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध होणार आहे.
सभेदरम्यान जिल्हा भाजपच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना चांदीची गदा भेट देण्यात आली. नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठीचा विकास वचननामा मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार आणि खासदार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.








