Navneet Rana wishes to return to Parliament : धारणीच्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत, राजकीय वर्तुळात चर्चा
Amravati नगर परिषद व नगरपंचायत निवडणूक प्रचारासाठी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धारणी येथे आले होते. या सभेत माजी खासदार नवनीत राणा यांनी उपस्थितांना संबोधित करताना, “दादा, तुमच्या आशीर्वादामुळे मी पुन्हा येईन,” असे म्हणत पुन्हा खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली.
सभेत भाषण करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “माजी खासदार नवनीत राणा या तुमच्या आशीर्वादाने लवकरच पुन्हा खासदार होतील.” त्यांच्या या वक्तव्याने नवनीत राणा यांची राज्यसभेतून खासदार म्हणून एन्ट्री होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी कुणालाही देणार नाही
मेळघाटची ‘बेटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवनीत राणा यांना पुन्हा संसदेच्या राजकारणात प्रवेश मिळू शकतो, असा संकेत मुख्यमंत्र्यांच्या शब्दांतून दिसल्याने भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये सभेनंतर मोठी चर्चा रंगली.
गेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाल्यानंतर मेळघाट–अमरावती परिसरात त्यांची राजकीय पुनर्रचना सुरू असल्याचे चर्चेत आहे. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनीच “लवकरच खासदार” असा उल्लेख केल्याने भाजप नवनीत राणांवर पुन्हा विश्वास दाखवू शकते, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. त्यांना राज्यसभेत पाठवत पुन्हा राज्यसभेत जाण्याची त्यांची इच्छा पूर्ण केली जाऊ शकते असेही चर्चा सुरू आहे.
Chitra Wagh : महिलांना ‘खर्रा खाणाऱ्या’ म्हणणाऱ्या दोडक्या भावाला धडा शिकवा
विधानसभा निवडणूक व त्यानंतर आता नगरपालिका निवडणुकांमध्ये माजी खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा हे भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासाठी तन मन धनाने काम करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याचाच फायदा नवनीत राणा यांना आगामी काळात होऊ शकतो अशीही चर्चा आहे.








