Devendra Fadnavis : तपोवन वृक्षतोड वादात देवेंद्र फडणवीसांचा ठाम पवित्रा

No trees in Google images from 10 years ago, politics on Kumbh Mela wrong : 10 वर्षांपूर्वीच्या गुगल इमेजमध्ये झाडं नव्हती, कुंभमेळ्यावर राजकारण चुकीचं

Nashik : तपोवन परिसरात कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारणीच्या प्रस्तावित कामांदरम्यान मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल सुरू असल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या आंदोलनात उतरले आहेत. तपोवनातील झाडे वाचवण्यासाठी नाशिककरांनी आक्रमक भूमिका घेतली असून कुंभमेळ्याकरीता साधुग्राम उभारला तरी पर्यावरण नष्ट करून नव्हे, अशी मागणी होत आहे. या वाढत्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना रोखठोक प्रतिक्रिया दिली. “या विषयावर राजकारण करू नका. कुंभमेळा ही आपली प्राचीन आणि सनातन परंपरा आहे,” असे ते म्हणाले.

फडणवीस यांनी सांगितले की नाशिक महानगरपालिकेने साधुग्रामसाठी तपोवनातील झाडे कापण्याचा निर्णय का घेतला, हे समजून घेणे आवश्यक आहे. प्रयागराज येथे झालेला कुंभमेळा 15 हजार हेक्टर जागेवर झाला होता. नाशिकमध्ये साधुग्रामसाठी फक्त 350 एकर जागा आहे आणि शहरात रामबन व साधुग्राम परिसराशिवाय दुसरी कोणतीही उपलब्ध जागा नाही. झाडांची अतिदाटी झाल्याने सध्याच्या ठिकाणी साधुग्राम उभारणी तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 2015–16 मधील गुगल इमेजेसमध्ये या परिसरात झाडे नव्हती. 50 कोटी वृक्षरोपण मोहिमेदरम्यान महानगरपालिकेने येथे झाडे लावली आणि ती आता मोठ्या प्रमाणावर वाढली, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र, “इतक्या मोठ्या प्रमाणावर झाडे कापणे योग्य नाही आणि आम्ही त्याबाबत विचार करत आहोत,” असेही त्यांनी नमूद केले.

Winter Session : आचारसंहितेचा आधार घेऊन पळवाट काढल्याचा सरकारवर आरोप !

“आवश्यक तीच झाडे कापली जातील. अनेक मोठी झाडे काढून रिलोकेट करण्याची योजना आहे. तपोवनात विनाकारण वृक्षतोड होणार नाही. कुंभमेळा हा पर्यावरणाशी असलेला आपला अध्यात्मिक संबंध अधिक दृढ करणारा आहे. त्यामुळे ‘क्लीन गोदावरी’ मोहीम हाती घेत आहोत,” असे फडणवीस म्हणाले. त्यांच्या निवेदनानंतर हा वाद आणखी तापला असून विकास व पर्यावरण यातील समतोल साधण्याचा प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.

Intense agitation in Parliament : विरोधकांच्या दबावानंतर केंद्र सरकारची माघार? ‘संचार साथी’चा वापर ऐच्छिक !

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तपोवनातील वृक्षतोडीवर प्रतिक्रिया दिली आहे. पर्यावरणाचा समतोल राखत समोपचाराने तोडगा निघणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. विकासाबरोबर पर्यावरण सुरक्षित ठेवणे ही काळाची गरज असून अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे, असेही अजित पवार यांनी ट्विट करून स्पष्ट केले. तपोवन आन्दोलन वाढत असताना राज्य सरकारचा पुढील निर्णय पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्यातील पुढील समीकरणे ठरवणारा ठरणार आहे.

_____