Dhantoli Building Scam : नझुल आणि मनपा अधिकाऱ्यांचे बिल्डरशी संगनमत उघड !

Congress city president MLA Vikas Thackeray gave evidence : शासनाला पस्तीस लाखांचा फटका फसव्या मार्गाने दिली मंजुरी

Nagpur : नागपूरच्या मध्यवर्ती धंतोली भागातील एका मल्टीस्टोरी हॉस्पिटल आणि कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या बांधकामात तब्बल 35 लाखांचा महसुली घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नझूल विभाग आणि नागपूर महानगरपालिकेच्या टाऊन प्लॅनिंग विभागातील अधिकाऱ्यांनी बिल्डर संजीव शर्मा यांच्याशी संगनमत करून शासनाला आर्थिक फटका दिल्याचेही आमदार ठाकरे म्हणाले.

ठाकरे यांनी सांगितले की, स्वतःच्या निवासासाठी लीजवर दिलेला १७ हजार ४६९ चौरस फुटांचा प्लॉट बिल्डर आणि लीज होल्डर्सनी फसव्या मार्गाने उपविभाजित केला. विभागातील अधिकाऱ्यांनी २०१९ मध्ये खोटा अहवाल देऊन निवासी बांधकाम सुरू असल्याचे दाखवले, तर मनपाने आधीच २०१६ मध्ये त्या ठिकाणी व्यावसायिक आणि निवासी वापरासाठी मंजुरी दिली होती. त्यामुळे लीज डिडच्या अटींचे उल्लंघन झाले आहे.

Local Body Elections : उमेदवारांना परवानग्यांसाठी वन विंडो सिस्टीम !

१६ मार्च २०२० रोजी ८ हजार ६६८ चौरस फूट क्षेत्रफळाच्या भागाला फ्री होल्ड मंजुरी देताना पुन्हा एकदा खोटी माहिती सादर करून शासनाची दिशाभूल करण्यात आली. या प्रकरणात वाणिज्यिक वापरासाठी आवश्यक असलेली १० टक्के रेडी रेकनर फी न भरता केवळ पाच टक्के म्हणजेच ३४.७८ लाख फी निवासी वापरासाठी भरली गेली. प्रत्यक्षात त्या जागेवर हॉस्पिटल आणि कमर्शियल कॉम्प्लेक्सचे बांधकाम मंजूर केले होते, असे पुरावे ठाकरे यांनी दिले.

Local Body Elections : निवडणुकीचा ज्वर चढतोय, इच्छुकांची कागदपत्रांसाठी धावपळ !

१५ सप्टेंबर २०२१ रोजी मनपा अभियंत्यांनी पुन्हा सुधारित परवानगी देऊन त्या प्रकल्पाला अधिकृतता दिली. त्यामुळे नझूल विभाग, मनपा अधिकारी आणि बिल्डर यांच्यातील संगनमत स्पष्टपणे दिसून येते. या प्रकरणात सहभागी नझूल आणि मनपा अधिकाऱ्यांवर तसेच बिल्डर व लीज होल्डर्सवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे.