BJP tried to defeat me in the assembly elections : निवडणुकीत हरविण्याचा भाजपने प्रयत्न केल्याचा आरोप
Nagpur माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे विधानसभा निवडणूकीपासूनच चर्चेत आहेत. त्यांच्या मतदारसंघातील निवडणूक फार गाजली होती. आता आत्राम यांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे. मला पाडण्यासाठी भाजपनेच प्रयत्न केले होते व महायुतीचा धर्म तोडला होता असा आरोप त्यांनी केला आहे.
त्यांच्या या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. भाजपकडून कुठल्याही नेत्याने आत्राम यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलेले नाही. मात्र या आरोपांमुळे गडचिरोलीच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. भाजपच्या गोटात संतापाचे वातावरण आहे. जोपर्यंत नेते भूमिका मांडत नाही, तोपर्यंत काहीच प्रतिक्रिया न देण्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठरविले आहे.
Praful Patel : टाईट कपडे घालून चालणार नाही, पक्ष वाढवावा लागेल
शुक्रवारी नागपुरात आयोजित पक्षाच्या विदर्भस्तरीय मेळाव्यात बोलताना आत्राम यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. ‘विधानसभा निवडणुकीत मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले. माझ्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला भाजप व काँग्रेसकडून मदत केली गेली. निवडणुकीत पैसे पुरवले गेले. मात्र तरी मी निवडून आलो,’असा उघड आरोप धर्मरावबाबा आत्राम यांनी केला.
आता स्थानिक स्वराज्य स्थंस्थेच्या निवडणुकीत दुसऱ्या पक्षाकडे जागेची भीक मागायची नाही. कोणाच्या कुबड्या घेऊन चालायचे नाही. गडचिरोली जिल्ह्यात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. मी कोणाचे ऐकणारही नाही. पक्ष आमच्या सोबत असेल, स्वबळावर गडचिरोलीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्ता आणली जाईल, ठाम अशी भूमिका मांडत आत्राम यांनी भाजपला उघड इशाराही दिला.
Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्र्याच्या जिल्ह्यातच महसूल विभागाच्या नियमांची मोडतोड
आत्राम यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे गडचिरोलीत महायुती एकत्र लढणार का व सोबत आले तरी एकदिलाने प्रचार करणार का असा सवाल उपस्थित होत आहे.