Dhananjay Munde : मला राजकीय आणि सामाजिक जीवनातून संपवण्याचा षडयंत्र, मुंडेंचा प्रतिहल्ला !

Conspiracy to eliminate me from political and social life, Dhananjay Munde’s counterattack : आरोपींसह माझं आणि मनोज जरांगे यांचं ब्रेन मॅपींग करावं

Mumbai : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले आहे. अशात राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मनोज जरागे यांच्यावर प्रतिहल्ला चढवला. मला राजकीय आणि सामाजिक जीवनातून संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. धनंजय मुंडेंचं अस्तित्व या पृथ्वीवरूनच नष्ट व्हावं, असा जरांगेचा प्रयत्न असल्याचा आरोप करत धनंजय मुंडे यांनी जरांगे यांच्यावर प्रतिहल्ला चढवला.

या संदर्भात मुंडे यांनी सांगितलं की, मनोज जरंगे यांच्या मराठा आंदोलनाला सुरुवातीपासून सर्वतोपरी मदत केली. आरक्षणासाठी मनोज जरांगे जेव्हा आंदोलन करत होते, तेव्हा मी स्वतः मैदानाची व्यवस्था केली, पिण्याचे पाणी आणि गाड्यांचीही सोय करून दिली होती. पण आज त्यांच्याकडूनच मला बदनाम करण्याचा कट रचला जात आहे. जरांगेंनी आता माझ्यावर थेट आरोप केले आहेत. त्यांनी जर खरच माझ्यावर संशय घेतला असेल तर त्यांनी स्थळ आणि वेळ सांगावं आरक्षणाच्या संदर्भात मी त्यांच्यासोबत कुठलीही चर्चा करायला तयार आहे.

Local body election : व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या !

जरांगे यांनी केलेल्या आरोपाच्या संदर्भात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, माझं, आरोपींचं आणि सोबतच जरांगे यांचंही ब्रेन मापिंग करावं, तेव्हा सत्य बाहेर येईल. मी लपवाछपवी करणारा माणूस नाही तर माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट पारदर्शक आहे. म्हणून जरगे यांनी केलेल्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नाही, असंही मुंडे यांनी नमूद केलं.

मराठा आरक्षणाच्या जरांगे यांच्या लढ्यात मी अडथळा निर्माण करत आहे, असा जरांगे यांचा आरोप आहे. पण यातही काही तथ्य नाही. कारण माझ्या मंत्रालयातून किंवा माझ्या मतदारसंघातून मराठा समाजासाठी दिलेल्या योजनांचं काय, यावर जरांगे बोलत नाहीत. मराठा समाजासाठी स्वतः मी अनेक वर्षांपासून काम करतो आहे, असंही मुंडे यांनी स्पष्ट केलं.

Supreme Court order : भटक्या कुत्र्यांना तात्काळ हटवा सर्वोच्च न्यायालयाचा कडक आदेश

मनोज जरांगे यांच्या आरोपावरून धनंजय मुंडे यांनी केलेल्या प्रतिहल्ल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. एकीकडे जरांगे पाटील यांचे आंदोलन तापलेले आहे, तर दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत तणावाचाही मुद्दा चर्चेत आला आहे. धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध चाललेलं हे षडयंत्र आहे. कारण त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढते आहे, असे मुंडे यांचे समर्थक म्हणतात. राज्यात सुरू असलेल्या या सर्व घडामोडींमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा वेगळ्या वळणावर गेला आहे. धनंजय मुंडे यांच्या थेट आणि आक्रमक भूमिकेमुळे आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येणार नाही.