व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Dilipkumar Sananda : घाटाखाली संघर्ष, घाटाच्या वर सलोखा; सानंदांच्या मध्यस्थीने रंगले नवे...

Dilipkumar Sananda : घाटाखाली संघर्ष, घाटाच्या वर सलोखा; सानंदांच्या मध्यस्थीने रंगले नवे राजकीय समीकरण!

New political equations take shape in Buldhana district through Dilipkumar Sanand’s mediation : तुपकर-पालकमंत्री संवादाचा पूल; सानंदांच्या भूमिकेची जिल्ह्यात जोरदार चर्चा

Buldhana जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मैत्री, विरोध आणि राजकीय हितसंबंधांची नवी समीकरणे आकार घेताना दिसत आहेत. कालपर्यंत एकमेकांवर टीकेची झोड उठवणारे नेते आज संवादाच्या टेबलावर दिसत असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे. अशाच एका घडामोडीमुळे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनस्थळी दिलीपकुमार सानंदा यांनी दिलेली भेट आणि त्यानंतर तुपकर व जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्यात घडून आलेला संवाद हा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी सानंदा यांनी पुढाकार घेतल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे विरोधक मात्र या घडामोडीकडे वेगळ्याच नजरेने पाहत आहेत.

Operation Tiger : ‘माझे नेते उद्धव ठाकरेच’; राजकीय चर्चांवर सिद्धार्थ खरात यांचा पूर्णविराम

विरोधकांच्या मते, सानंदा यांनी केलेली मध्यस्थी ही केवळ सामाजिक किंवा राजकीय सलोख्यासाठी नसून आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने टाकलेले रणनीतीपूर्ण पाऊल असू शकते. त्यामुळे “सानंदा नेमके कोणाच्या बाजूने आहेत?” हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देतानाच सत्ताधाऱ्यांशी संवाद कायम ठेवण्याची त्यांची भूमिका अनेकांच्या उत्सुकतेचा विषय ठरली आहे.

राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात, तर परिस्थितीनुसार भूमिका बदलत असतात, याची प्रचिती या घटनेतून पुन्हा एकदा आली आहे. तुपकर आणि पालकमंत्री यांच्यातील संवादासाठी पूल उभारण्याचे श्रेय सानंदा यांना दिले जात असले तरी त्यामागे राजकीय दूरदृष्टी की समन्वयाची भूमिका, याबाबत वेगवेगळ्या स्तरावर चर्चा सुरू आहे.

Water crisis : मान्सूनची ओढ वाढली; बुलढाण्यात १.१५ लाख नागरिकांची तहान टँकरवर!

दरम्यान, या संपूर्ण घडामोडीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वातावरणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. घाटाखाली राजकीय बिघाडी आणि आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच घाटावर मैत्रीची नवी घडी बसवण्यात दिलीपकुमार सानंदा यशस्वी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. आगामी काळात या संवादाचे रूपांतर नव्या राजकीय समीकरणांत होते की नाही, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!