व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Dispute over post : श्रीरामांविषयी प्रक्षोभक वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल

Dispute over post : श्रीरामांविषयी प्रक्षोभक वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल

badlapur-bjp-leader-daughter-controversial-statement-lord-ram-case-registered-party-action : भाजप पदाधिकाऱ्यांच्या लेकीवर गुन्हा दाखल, आईचा राजीनामा, पक्षाकडून कारवाई

Thane : बदलापूर येथे श्रीरामांविषयी कथित प्रक्षोभक वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शनिवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्या मुलीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या रीलमध्ये प्रभू श्रीरामांविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणीला ताब्यात घेऊन तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पक्षानेही तत्काळ कारवाई करत तिच्या आईकडून पदाचा राजीनामा घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर पूर्व येथील भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी प्रतिभा जाधव यांची कन्या मृणाल जाधव हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ रील पोस्ट केली होती. या व्हिडीओमध्ये श्रीरामांविषयी वापरलेल्या कथित आक्षेपार्ह भाषेमुळे तो व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आणि संबंधित तरुणीवर कठोर कारवाईची मागणी केली.

ZP elections : ५० टक्के आरक्षण मर्यादा प्रकरणामुळे राज्यातील २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबल्या !

घटनेनंतर बदलापूर पूर्वेतील खरवई परिसरात काही काळ दुकाने बंद ठेवण्यात आल्याचे तसेच रिक्षा सेवा देखील ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याने पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत संबंधित तरुणीला ताब्यात घेतले आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला. परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर भाजपने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करत प्रतिभा जाधव यांच्याकडून पदाचा राजीनामा घेतल्याची माहिती दिली. त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले. पक्षाच्या वतीने अशा प्रकारच्या वक्तव्यांना कोणतीही सहनशीलता नसल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला. प्रभू श्रीरामांविषयी वापरण्यात आलेली कथित शिवराळ भाषा अत्यंत निषेधार्ह असून अशा प्रकारचे वक्तव्य कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही, असे त्यांनी म्हटले. कोणतीही व्यक्ती कोणत्याही पदावर असो, धार्मिक भावना दुखावणाऱ्या कृत्याला माफी नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

Massive explosion : काटोलमधील एसबीएल कंपनीत भीषण स्फोट

दरम्यान, प्रतिभा जाधव आणि त्यांचे पती यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना घडलेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला असून परिस्थिती शांततेत हाताळण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून सोशल मीडियावरील संबंधित सामग्रीची पडताळणी केली जात आहे.

error: Content is protected !!