Education department : सीईओंच्या दालनात भरली शाळा; सात वर्षांपासून शिक्षक नसलेल्या उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांचा आक्रोश

Urdu school students protest in CEO’s hall : शैक्षणिक प्रश्नांवर राजकीय गप्पा, पण विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी

Buldhana शिक्षणाचा अधिकार हा फक्त कागदावर राहिला आहे का? असा सवाल बुलढाणा जिल्ह्यातील किन्होळा येथील जिल्हा परिषद उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा प्रशासनासमोर उभा केला आहे. सात वर्षांपासून इंग्रजी आणि गणित विषयाचे शिक्षक नसल्याने हतबल झालेल्या विद्यार्थ्यांनी २० ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद मुख्यालय गाठले आणि सीईओंच्या दालनासमोरच बाक, पुस्तके, वह्या घेऊन वर्ग भरवून अनोखे आंदोलन केले.

चिखली तालुक्यातील या शाळेत इयत्ता १ ली ते १० वीपर्यंत सुमारे ३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र सात वर्षांपासून इंग्रजी आणि गणित या महत्त्वाच्या विषयांचे शिक्षक न मिळाल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन महिने लोटले तरी नियुक्ती झाली नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

Congress demands for compensation : अतिवृष्टीमुळे अमरावती व भातकुलीत शेतीचे प्रचंड नुकसान; मदतीची काँग्रेसकडून मागणी

शालेय व्यवस्थापन समितीने १८ जुलै रोजीही लेखी मागणी केली होती. समितीच्या निवेदनानुसार – इयत्ता ६ वी ते ८ वीकरिता भाषा (इंग्रजी) विषयासाठी १ शिक्षक, इयत्ता ७ वी ते १० वीकरिता संपूर्ण विषयांसाठी ३ शिक्षक तात्काळ नियुक्त करावेत. अन्यथा शाळेतील पटसंख्या घटण्याचा धोका आहे.

Revenue department : तहसीलदारांच्या निलंबनावरून राज्यभर कामबंदचा इशारा!

विद्यार्थ्यांनी आंदोलनादरम्यान प्रश्न केला – “आमच्या भविष्यासाठी जबाबदार कोण? सात वर्षांपासून शिक्षक नाहीत, दहावीची परीक्षा कशी देणार?” उर्दू शाळा, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षकांची कमतरता या विषयांवर राजकीय पातळीवर चर्चा मात्र रंगते; पण प्रत्यक्ष कृती शून्य आहे. शिक्षण विभागाने पूर्वी गणित व विज्ञान विषयाकरिता एका शिक्षकाची तात्पुरती नेमणूक केली होती, मात्र आता पुन्हा विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे.