Eknath Shinde : मुंबई-पुण्यात उबाठा तर रायगडात शरद पवार गटाला खिंडार !

 

Uddhav Thackeray and Sharad Pawar’s office bearers join Eknath Shinde’s Shiv Sena : उबाठाची दैनंदिनी तयार करणारे साकेत पवार टीम शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल

Mumbai : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास दाखवत मुंबई, पुणे येथील उबाठाच्या व रायगड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आगरी कोळी समाजाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.

उबाठा गटाच्या माजी नगरसेविका आणि बारामतीच्या जिल्हाप्रमुख कल्पना थोरवे, विधी विभागाचे प्रमुख संभाजी थोरवे, पुणे उप-शहरप्रमुख नितीन पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आगरी कोळी समाजाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोहर ठाकूर, उरणचे अँडव्होकेट योगशे बापर्डेकर यांनी हाती भगवा झेंडा घेत शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.

Eknath Shinde : ५० खोके नव्हे, तर ३ हजार खोके दिले!

उबाठा गटाच्या दैनंदिनीची निर्मिती करणारे साकेत पवार आणि त्यांच्या टीममधील त्यांचे सहकारी स्वप्नील माने, सुनील जाधव, रुपेश सुर्वे यांनीही मूळ शिवसेनेत प्रवेश घेतला. तसेच मानव आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील चौधरी यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य नयन सिंग, महेश शर्मा, संजय सोलंकी, जगदिश कुमावत, सुरेश चौधरी, प्रवीण चौधरी, सिताराम चौधरी, दिनेश चौधरी, नरेश प्रजापती, राजेंद्र मुळे, संजय देशमुख आणि त्यांचे सर्व सहकारीदेखील शिवसेनेमध्ये दाखल झाले.

पक्षप्रवेश कार्यक्रमात शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेनेचे माजी नगरसेवक पांडुरंग पाटील, प्रवक्ते राहुल लोंढे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी आवर्जून उपस्थित होते.