व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Election Commission of India : सहा वर्षांत उमेदवार उभा केला नाही, या...

Election Commission of India : सहा वर्षांत उमेदवार उभा केला नाही, या पक्षाची मान्यता होणार रद्द?

Election Commission issues show cause notice to ‘Bharat Jan Sangram Party’ : निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस, नोंदणीकृत पक्षांच्या यादीतून वगळण्याचा प्रस्ताव

Amravati गेल्या सहा वर्षांपासून कोणत्याही निवडणुकीत उमेदवार न उभा केल्याने भारतीय निवडणूक आयोगाने ‘भारत जनसंग्राम पक्षाला’ कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आयोगाने या पक्षाला नोंदणीकृत पक्षांच्या यादीतून वगळण्याचा प्रस्ताव ठेवला असून, उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ च्या कलम २९-अ अंतर्गत ‘भारत जनसंग्राम पक्ष’ राजकीय पक्ष म्हणून नोंदणीकृत आहे. मात्र, २०१९ पासून झालेल्या लोकसभा, राज्य विधानसभेच्या तसेच पोटनिवडणुकांमध्ये या पक्षाने कोणताही उमेदवार उभा केलेला नाही. त्यामुळे हा पक्ष कलम २९-अ च्या उद्देशानुसार कार्यरत नसल्याचे आयोगाचे मत आहे.

Akash Fundkar : कामगारांची ‘मधली सुटी’ आता एक तासाची!

कारवाई पूर्वी आयोगाने पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली आहे. पक्षाने आपले लेखी म्हणणे, अध्यक्ष किंवा सरचिटणीस यांचे प्रतिज्ञापत्र आणि संबंधित कागदपत्रे ४ सप्टेंबरपर्यंत मुख्य निवडणूक अधिकारी, कक्ष क्रमांक ६२४, ॲनेक्स, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई येथे सादर करणे बंधनकारक आहे.

Crime in Amravati : किती हे भयंकर? वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मायलेकाचा खून

तसेच, १० सप्टेंबर २०२५ रोजी मंत्रालयातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष सुनावणी घेण्यात येणार आहे. या सुनावणीला पक्षाचे अध्यक्ष, सरचिटणीस किंवा पक्षप्रमुख यांची उपस्थिती अनिवार्य असेल. दिलेल्या मुदतीत पक्षाने कोणतेही उत्तर न दिल्यास, त्यांना या प्रकरणी काहीही म्हणायचे नाही असे गृहीत धरून आयोग योग्य ती कारवाई करेल, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!