AB form scam, allegations of bogus certificates and arbitrary governance, have bewildered the BJP: एबी फॉर्म घोटाळा, बोगस पट्ट्यांचे आरोप आणि मनमानी कारभार, भाजपाला भोवला!
Chandrapur : भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांनी तिकीट वाटप करताना केलेली मनमानी आणि त्यांचे कट्टर समर्थक असलेले बडतर्फ शहर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी केलेल्या एबी फॉर्म घोटाळ्याचा मोठा फटका भाजपला महापालिकेच्या निवडणुकीत बसला. त्यामुळे भाजपाचा गड असलेली चंद्रपूर महानगरपालिका भाजपाला हातची गमावावी लागली.
चंद्रपूरमध्ये ६६ पैकी काँग्रेसचे ३० ( जनविकास सेनेचे ३ पकडून) तर भाजपचे २३ नगरसेवक निवडून आले. चंद्रपूरच्या जनतेने सत्ता स्थापन करण्यासाठी कुठल्याच पक्षाला बहुमत दिलेले नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांना सत्ता स्थापन करण्यासाठी उद्धव ठाकरे सेना ६, वंचित आघाडी २, शिंद सेना १, एमआयएम १ आणि दोन अपक्ष सदस्यांसोबत तडजोड करावी लागणार आहे. मात्र उद्धव सेना काँग्रेससोबत जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे येथे आघाडीचे सरकार येण्याची दाट शक्यता आहे.
Akola municipal corporation : अकोला महापालिकेत त्रिशंकू स्थिती; भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला
महापालिका निवडणूक प्रमुख नियुक्त करण्यापासून तर उमेदवारी वाटप करेपर्यंत भाजपमध्ये मोठे वाद उफाळून आले होते. शेवटी प्रदेशाध्यक्षांना यात दखल द्यावी लागली होती. त्यांनीच प्रदेश कार्यालयातून भाजप उमेदवारांची यादी भाजप नेत्यांकडे पाठवली होती. मात्र भाजपचे शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी या यादीतील काही उमेदवार परस्पर बदलले. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची गंभीर दखल घेऊन तत्काळ कडक कारवाई केली. तात्काळ शहर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांना बडतर्फ केले. याचा विपरीत परिणाम मतदारांवर झाला.
एवढेच नव्हे तर कासनगोट्टूवार यांनी बोगस पट्टेवाटप करीत नागरिकांची दिशाभूल केल्याचे आरोप निवडणुकीच्या प्रचारात समोर आले. चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांची याची तक्रार करून फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती.
Election results 2026 : मुंबईसह राज्यातील महापालिकांवर भाजपचा झेंडा
आमदार किशोर जोरगेवार यांनी महापालिकेत भाजपचे ५० नगरसेवक निवडून येतील अशी वल्गना केली. तत्पूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत आमदार जोरगेवार यांनी २०० युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन मतदारांना दिले होते. त्याची पूर्ती आमदार किशोर जोरगेवार यांनी केली नाही. भाजपमधील भांडणे, आमदारांनी दिलेली खोटी आश्वासने, पक्षाने उमेदवार ठरवले असताना १७ उमेदवारांची नावे वगळणे हे जनतेलाच नव्हे तर भाजपच्या कार्यकर्त्यांनासुद्धा पटले नाही. त्यांनी पक्ष आपल्या मालकीचा समजणाऱ्या नेत्याला मतदानातून त्यांची जागा दाखवून दिली.
किशोर जोरगेवार यांना पक्षात घेतल्यापासून भाजपची शिस्त बघडली. आपसात मतभेद उफाळून आले. कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. चंद्रपूरमध्ये भाजपला वाचवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून मोठे ऑपरेशन करण्याची गरज असल्याचे निष्ठावान कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
__








