Uddhav Thackeray party’s tractor march against Devendra Fadnavis government : पश्चिम विदर्भात उबाठाचे ट्रॅक्टर मोर्चे, अमरावतीमधील मोर्चा पोलिसांनी अडवला
Amravati : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज (२ मे) पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यांत ट्रॅक्टर मोर्चा काढला. अमरावतीमध्ये शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर पोलिसांनी हा मोर्चा अडवला. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली.
मोर्चा दरम्यान अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या सर्व नेत्यांनी शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. सातबारा कोरा करण्याचे त्यांचे आश्वासन हवेतच विरले. त्यामुळे शेतकरी सत्ताधाऱ्यांवर चांगलेच चिडलेले आहेत. हवालदिल झालेल्या एका शेतकऱ्यांनने ‘वारे विदर्भाच्या पोरा.. सातबारा कोरा.. तुझा खोटा रे नारा..!’, अशी घोषणाबाजी केली.
शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी, पीक विमा, शेतमालाला भाव, शेतीला तार कम्पाऊंड, वीज बिलासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्या मोर्चातून करण्यात आल्या. अमरावती, अकोला, वाशीम आणि बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयांवर हे मोर्चे नेण्यात आले. बुलढाण्यामध्ये संपर्क प्रमुख नरेंद्र खेडकर, आमदार सिद्धार्थ खरात यांनी मोर्चाचे नेतृत्व केले, अकोल्यात आमदार नितीन देशमुख यांनी तर अमरावतीत स्वतः खासदार अरविंद सावंत यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
Shivsens uddhav Balasaheb Thackrey : शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा प्रचारात फिरत होते, तेव्हा तेव्हा ‘सातबारा कोरा.. कोरा.. कोरा.. कोरा…’, असे वचन देत होते. त्यांचे नेतेही हीच री ओढत होते. पण सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्र्यांसह एकही मंत्री याबद्दल बोललेला नाही. सातबाबा तर कोरा केलाच नाही, उलट १ रुपयाची पीक विमा योजना बंद करून टाकली. त्यामुळे शेतकरी आणखीनच संकटात आला आहे.
Vidarbha Farmers : धानाचे पीक भिजले, संकट कोसळले, शेतकरी हवालदील!
लाडक्या बहीणींना केवळ आशेवर ठेवले. निवडणुकीपूर्वी १५०० रुपये दिले. सत्तेत आल्यावर २१०० रुपये देण्याचे आश्वासन देऊन मते घेतली. पण आता त्यांनाही २१०० रुपये देण्याचा पत्ता नाही. या बहीणीच आता त्यांच्या लाडक्या भावांना त्यांची जागा दाखवतील, असे अरविंद सावंत म्हणाले.