number-of-farmers-for-loan-waiver-yet-to-be-clear : अकोला जिल्ह्यात ९०,६८८ शेतकऱ्यांचे १,०६९.६४ कोटींचे पीककर्ज थकीत
Akola राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. मात्र या योजनेच्या अटी-शर्ती निश्चित झाल्यानंतरच जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा अंतिम आकडा स्पष्ट होणार आहे.
सध्या उपलब्ध माहितीनुसार, जिल्ह्यातील ९० हजार ६८८ शेतकऱ्यांचे तब्बल १ हजार ६९ कोटी ६४ लाख रुपयांचे पीककर्ज थकीत आहे. सरकारच्या घोषणेनुसार पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात शुक्रवारी ही योजना जाहीर करण्यात आली. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीककर्ज थकीत असलेल्या राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे.
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार ठरवतील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष!
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँका, खासगी व्यापारी बँका आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखांमधून पीककर्ज घेतलेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ देण्याचाही निर्णय सरकारने जाहीर केला आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध बँकांच्या २२९ शाखांकडून येत्या दोन दिवसांत माहिती मागविण्यात येणार असल्याची माहिती अग्रणी बँक जिल्हा व्यवस्थापक (एलडीएम) नयन सिन्हा यांनी दिली.
Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचे राष्ट्रीय राजकारणात पाऊल; या राज्याची सोपवली जबाबदारी
जिल्ह्यात सप्टेंबर २०२५ अखेरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँका, खासगी व्यापारी बँका तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखांमधून ९० हजार ६८८ शेतकऱ्यांनी एकूण १ हजार ६९ कोटी ६४ लाख रुपयांचे खरीप पीककर्ज घेतले आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेच्या सूत्रांनी दिली.








