Ration cards of ineligible beneficiaries will be cancelled : कागदपत्रे तयार ठेवण्याचे अधिकाऱ्यांचे आवाहन
Bhandara जिल्ह्यात शासकीय स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांची गाठ आता शासकीय यंत्रणा घेणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने लवकरच मोठ्या प्रमाणात रेशनकार्ड पडताळणी मोहीम सुरू होणार आहे. लाभार्थ्यांनी आपले वार्षिक उत्पन्न व रहिवासी पुरावा तयार ठेवणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, रेशनकार्ड रद्द होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील तब्बल २ लाख ५२ हजार १२२ रेशनकार्डधारकांच्या माहितीची छाननी होणार असून, यात प्राधान्य, अंत्योदय, एपीएल आणि पांढऱ्या कार्डधारकांचा समावेश आहे. ८९.४६ टक्के लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केले असले तरी १८.५४ टक्के लाभार्थी अद्याप प्रलंबित आहेत. यामुळे पडताळणी मोहिमेमुळे अपात्र लाभार्थ्यांचे पत्ते, उत्पन्न आणि कागदपत्रांची माहिती गोळा केली जाणार आहे.
Ladaki Bahin Scheme : ‘लाडक्या बहिणीं’च्या दहाव्या हप्त्याला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त!
पुरवठा विभागाच्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती देखील गरीबांसाठीच्या रेशनचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, काही लाभार्थ्यांचे मृत्यू झालेले असतानाही त्यांच्या नावावरून अजूनही धान्य घेतले जात आहे. यामुळे, या मोहिमेद्वारे अपात्र, मृत किंवा चुकीची माहिती दिलेल्या लाभार्थ्यांना योजनेतून वगळले जाणार आहे.
लाभार्थ्यांनी भरावयाच्या फॉर्ममध्ये ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन विभागांमध्ये माहिती मागवण्यात येणार आहे. हा फॉर्म स्वस्त धान्य दुकानदारांकडे जमा करावा लागणार असून, पुरवठा विभाग त्याची पडताळणी करेल. चुकीची किंवा अपूर्ण माहिती आढळल्यास, संबंधितांचे रेशनकार्ड रद्द करण्यात येणार आहे.
Bhandara Municipality : नालेसफाईसाठी २० लाखांचा खर्च; तरीही अस्वच्छता कायम!
ही कागदपत्रे महत्त्वाची
1. उत्पन्नाचा दाखला – चालू आर्थिक वर्षासाठी अधिकृत दाखला.
2. रहिवासी प्रमाणपत्र – संबंधित पत्त्यावर आपण वास्तव्यास आहोत, याचा स्पष्ट पुरावा.