Yuva Sena holds eight-hour protest over substandard ration supplies : जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयावर दिली धडक, अधिकाऱ्यांना ‘खिचडी’चे आमंत्रण
Buldhana चिखली तालुक्यातील रेशन दुकानांमधून वितरित होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या धान्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या ‘भोंगळ’ कारभाराचा निषेध करण्यासाठी युवा सेनेने जिल्हा पुरवठा अधिकारी (DSO) कार्यालयावर धडक दिली. तब्बल आठ तास चाललेल्या या आंदोलनातून प्रशासनाची असंवेदनशीलता आणि ढिसाळ नियोजन समोर आले आहे.
युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर आणि विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख ओम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. रेशनवर मिळणारी कीड लागलेली ज्वारी आणि अस्वच्छ तांदळापासून तयार केलेली खिचडी व भाकरी घेऊन आंदोलक थेट जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री ठाकरे यांच्या कार्यालयात पोहोचले. “जर हे धान्य गरिबांसाठी योग्य असेल, तर अधिकाऱ्यांनीही ते खाऊन दाखवावे,” असे आव्हान आंदोलकांनी दिले. मात्र, सुरुवातीला अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आंदोलकांचा संताप अधिकच वाढला.
Hidayat Patel : काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची मशिदीबाहेर हत्या
यापूर्वी निवेदन देऊनही निकृष्ट धान्याचे वाटप सुरूच राहिल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आंदोलनादरम्यान जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कार्यालयातून काढता पाय घेतल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ठिय्या दिला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांना तंबी देत, “असे धान्य उचललेच कसे?” असा सवाल केला. मात्र, ही केवळ आपली जबाबदारी झटकण्याची कृती असल्याचे मत आंदोलकांनी व्यक्त केले.
Shweta Mahale : ‘चूक खपवून घेतली जाणार नाही’, शुभारंभालाच आमदारांचा इशारा
प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर, “यापुढे बोगस धान्याचा पुरवठा होणार नाही, तसेच संबंधित दोषी पुरवठादारावर कठोर कारवाई केली जाईल,” असे लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.








