Girish Gandhi : गांधींसाठी भाजपने संघविरोधी उमेदवारांना दिले बळ!

bjp-suported-anti-rss-candidates-openly-invidarbha-sahitya-sangh-election : विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीतून अनेकांचा ‘पक्ष’प्रवेश

Nagpur विदर्भ साहित्य संघाची निवडणूक साहित्यिकांपेक्षा राजकारण्यांनीच जास्त डोक्यावर घेतली होती. त्यातही फक्त भाजप हा एकमेव पक्ष या निवडणुकीत प्रत्यक्ष काम करत होता. गिरीश गांधींच्या पॅनलसाठी भाजपने पक्षाची विदर्भातील यंत्रणा कामाला लावली होती. पण, त्यामुळे पॅनलमधील संघाच्या कट्टर विरोधकांच्याही पाठीशी भाजप उभा राहिला, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. कदाचित निवडणुकीच्या माध्यमातून अनेकांचा ‘पक्ष’प्रवेश करून घेण्यासाठी हा खटाटोप असावा, असे आता जाहीरपणे बोलले जात आहे.

साहित्यिकांना जात-पात-धर्म नसतो. लेखक हा जातीने नव्हे तर त्याच्या लेखणीने मोठा असतो, अशी विधानं भाषणांमध्ये अनेकदा ऐकायला मिळतात. तसेच राजकारणाच्याही बाबतीत आहे. आम्ही जात-पात पाळत नाही, समाजासाठी काम करतो, असं राजकीय व्यासपीठावरून कायम सांगितलं जातं. मुळात या दोन्ही यंत्रणा त्या उलटच काम करत असतात. याची प्रचिती भाजपन-एमआयएम, काँग्रेसन-शिवसेना अश्या आघाड्यांवरून आपल्याला आलेली आहे.

Girish Gandhi : गिरीश गांधींचे अभिनंदन करणाऱ्या पोस्टरवर भाजपचे ‘कमळ’ !

विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत काही वेगळे घडले नाही. गिरीश गांधी यांच्या सृजनसेतू पॅनलला एकहाती सत्ता मिळवून देण्यासाठी भाजपच्या एका निवडणूक ‘मॅनेजमेंट गुरू’ने आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली होती, हे सर्वश्रुत आहे. कोऱ्या मतपत्रिका गोळा करण्यासाठी आजी-माजी नगरसेवक, मंडळांचे अध्यक्ष, प्रभागातील पदाधिकारी या साऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले. हे संपूर्ण विदर्भात घडले. पण हे सारे होत असताना भाजपमधील एकाही सच्च्या ‘स्वयंसेवकाने’ उलट सवाल केला नाही. उलट ‘पक्षाचा आदेश’ मानून काम केले.

भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी गेल्या महिन्याभरापासून जे श्रम घेतले ते गिरीश गांधींच्या पॅनमधील कट्टर संघविरोधी लोकांना निवडणून आणण्यासाठी होते, याची पुसटशी कल्पनाही कुणाला आली नाही. या पॅनमधील काही उमेदवार सातत्याने भाजप व संघाच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. एवढेच नव्हे तर भाजप व संघामधील सर्वोच्च नेत्यांच्या विरोधातही वादग्रस्त विधानं करीत असतात. पण निवडणुकीत या गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात, अशी भूमिका घेण्यात आली.

Eknath shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना

‘सरस्वती’च्या फोटोला विरोध
२०१५च्या सुमारास असहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित करून देशभरात अनेक साहित्यिकांनी सरकारकडून मिळालेले पुरस्कार परत केले होते. भाजप सरकारच्या विरोधात ‘पुरस्कार वापसी’ची मोहीम राबवण्यात आली. त्यात राज्य सरकारचा पुरस्कार परत करणारे नागपुरातील एक प्राध्यापक-साहित्यिक देखील होते. गिरीश गांधींच्या पॅनलमधील काही भाजप व संघविरोधी सदस्यांनी त्यावेळी या प्राध्यापक महोदयांचे जाहीर समर्थन केले होते. एवढेच नव्हे तर ‘सरस्वती’चा फोटो ठेवलेल्या मंचावर साहित्याचा पुरस्कार स्वीकारणार नाही, या यशवंत मनोहरांच्या भूमिकेचेही त्यांनी जाहीर स्वागत केले होते. मात्र, निवडणुकीत दोन्ही बाजुंनी या गोष्टींकडे सरसकट दुर्लक्ष करण्यात आले, असे दिसते.

भूमिका, तत्व अन् निष्ठांना तिलांजली
विदर्भ साहित्य संघाची निवडणूक खऱ्या खुऱ्या ‘राजकारणा’ला लाजवेल, अश्याच पद्धतीने झाली. सत्तेत येणे, एवढाच उद्देश डोळ्यापुढे ठेवण्यात आला. यामध्ये ज्या डाव्या विचारसरणीच्या किंवा भाजप-संघविरोधी उमेदवारांना गिरीश गांधींनी आपल्या पॅनलमध्ये सामावून घेतले, त्यांनी देखील सत्तेत येण्यासाठी ‘भाजप आपल्याला मदत करतोय’ याकडे दुर्लक्ष केले. भाजप-संघ-विसासंघ असा ‘सृजन’ सेतू निर्माण होण्यासाठी भूमिका, तत्व अन् निष्ठांना तिलांजली देत आपल्या ‘आकांक्षां’ना त्यांनी महत्त्व दिले, असे बोलले जात आहे.