व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Gopikishan bajoria : शिवसेनेचे नेते म्हणतात, ‘अकोला शहरात हेल्मेटसक्तीची गरज नाही’

Gopikishan bajoria : शिवसेनेचे नेते म्हणतात, ‘अकोला शहरात हेल्मेटसक्तीची गरज नाही’

Shivsena leader opposes helmet compulsion in Akola city : प्रशासनाने सामान्य जनतेला भयभीत करू नये; फक्त महामार्गांवर सक्ती करण्याची मागणी

Akola अकोला शहरात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापरण्याची सक्ती करणे योग्य नाही. या सक्तीच्या आदेशामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये, असे मत शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी व्यक्त केले.

अकोला जिल्ह्यात १ ऑगस्टपासून दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शहरातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ दंड होऊ नये म्हणून अनेक नागरिक रस्त्याच्या कडेला विक्रीसाठी उपलब्ध असलेले निकृष्ट दर्जाचे हेल्मेट खरेदी करून तात्पुरती सुटका करून घेत आहेत. मात्र, अशा हेल्मेटचा वापर केल्यास अपघाताच्या वेळी जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे, असे बाजोरिया यांनी सांगितले.

Caste census: जातीनिहाय जनगणनेत ओबीसींचा कॉलम नसल्याने असंतोष

जिल्हा आणि तालुक्याच्या शहरांमध्ये हेल्मेटची सक्ती करण्याची आवश्यकता नाही, असेही त्यांनी नमूद केले. शहरांचे क्षेत्रफळ तुलनेने मर्यादित असून, शहरांत वाहनधारक सामान्यतः कमी वेगाने वाहने चालवतात. त्यामुळे काही मीटरच्या अंतरासाठी हेल्मेट वापरण्याची सक्ती करणे योग्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

महामार्गांवर सक्ती करा
राज्यात काही ठिकाणी अशा प्रकारची सक्ती नसताना एखाद्या अधिकाऱ्याच्या मनात आले म्हणून अचानक मोहीम राबविली जाते आणि नंतर तिचा विसर पडतो. सध्या सामान्य जनता महागाई, रस्त्यांवरील खड्डे आणि अन्य विविध समस्यांनी त्रस्त आहे. अशा परिस्थितीत हेल्मेटच्या सक्तीमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढवू नये, असे बाजोरिया यांनी म्हटले.
शहरांऐवजी राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर हेल्मेट वापरण्याची सक्ती प्रभावीपणे करावी.

Akola Municipal corporation : अदानी सीएनजीला जागा देण्यावर मनपा सभागृहात घमासान!

महामार्गांवर वाहनांचा वेग अधिक असल्याने तेथे हेल्मेट वापरणे सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक आहे. मात्र, छोट्या शहरांमध्ये हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्याऐवजी प्रशासनाने नागरिकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी बाजोरिया यांनी केली.

error: Content is protected !!