Gram Panchayat ELections : मोताळा तालुक्यातील ५२ गावात राजकारण तापणार

Ward delimitation program announced for 52 villages : प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर, एप्रिलमध्ये हरकतींसाठी संधी

Motala जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी प्रशासनाने प्रभाग रचना कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर केला आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व वेळेत पूर्ण करण्यासाठी सविस्तर वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रभाग रचनेचे प्रमुख टप्पे

२० फेब्रुवारी २०२६ : गुगल अर्थ नकाशे सुपर इम्पोज करून गावनिहाय नकाशे अंतिम करणे.
२७ फेब्रुवारी २०२६ : तलाठी व ग्रामसेवक यांच्यामार्फत संयुक्त स्थळ पाहणी व सीमा निश्चिती.
५ मार्च २०२६ : तहसीलदार, गट विकास अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या समितीकडून प्रारूप तपासणी.
११ ते २३ मार्च २०२६ : जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करून राज्य निवडणूक आयोगाची मान्यता मिळवणे.
३० मार्च २०२६ : समितीद्वारे दुरुस्त्यांसह प्रारूप प्रभाग रचना मंजूर करणे.

Zilla Parishad election : जिल्हा परिषद निवडणुका लांबल्याने इच्छुकांना ‘विश्रांती’

लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी एप्रिल महिन्यात हरकती व सूचना सादर करण्याची संधी देण्यात आली आहे.

७ एप्रिल २०२६ : नमुना-बमध्ये प्रारूप प्रभाग रचनेची प्रसिद्धी.
१३ एप्रिल २०२६ : हरकती व सूचना सादर करण्याची अंतिम मुदत.
२१ एप्रिल २०२६ : प्राप्त हरकतींवर सुनावणी पूर्ण करणे.
२८ एप्रिल २०२६ : जिल्हाधिकाऱ्यांकडून अंतिम प्रभाग रचना निश्चिती.
४ मे २०२६ : नमुना-अमध्ये अंतिम प्रभाग रचनेची अधिकृत प्रसिद्धी.

Zilla Parishad Elections : बांधकाम कामगार नोंदणी शिबिरांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी

या कार्यक्रमात आडविहीर, वरूड, शेलापूर, घुस्सर बुद्रुक, माकोडी, उन्हा, आव्हा, टेंभी, टाकळी घडेकर, तळणी, दाभाडी, सावरगाव जहाँगीर, लिहा बुद्रुक, कोल्ही, पोफळी, सारोळा मारोती, सारोळापीर, काबरखेड, वडगाव खंडेराव, पुन्हई, धामणगाव बढे, सिंदखेड, रिधोरा, पिंपळगाव देवी, रोहिणखेड, कोथळी, जयपूर, बोराखेडी, परडा, तरोडा, अंत्री, मुर्ती, पान्हेरा, किन्होळा, तपोवन, दाभा, उबाळखेड, खामखेड, मोहेगाव आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

ग्रामस्तरावर सूचना फलक तसेच स्थानिक प्रसिद्धी माध्यमांद्वारे या प्रक्रियेची माहिती देण्यात येणार आहे. नागरिकांनी नकाशे व प्रभाग सीमा काळजीपूर्वक तपासून, काही हरकती असल्यास त्या विहित मुदतीत प्रशासनाकडे सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.