Instructions Given to Accept Party’s Decision : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या सूचना, जळगाव जामोद जिंकण्यासाठी लढण्याचे आवाहन
Jalgao Jamod आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या जळगाव जामोद येथील आढावा बैठकीत पक्षात नवचैतन्य संचारले. या बैठकीत बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, “जळगाव नगरपरिषदेत पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकवायचा आहे. पक्ष जो निर्णय घेईल, तो सर्वांनी एकसंघ राहून मान्य करून त्याच्या विजयासाठी कामाला लागा.”
प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले की, “जळगाव जामोद नगरपरिषदेत पूर्वी काँग्रेसचे नगराध्यक्ष होते. यावेळीही नगराध्यक्ष आणि बहुसंख्य नगरसेवक काँग्रेसचे निवडून यावेत, हीच सर्वांची जबाबदारी आहे.” त्यांनी २ डिसेंबरला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान ही बैठक घेतली.
Local Body Elections : अमरावतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ, ‘युवा स्वाभिमान’ स्वबळावर!
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे होते, तर प्रदेश सरचिटणीस रामविजय बुरुंगले, नेत्या डॉ. स्वाती वाकेकर, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅड. मोहतेश्याम रजा, माजी जि.प. अध्यक्ष प्रकाश पाटील, अकोटचे संजय बोडखे, अॅड. ज्योती ढोकणे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी आपल्या भाषणात जळगाव जामोद तालुक्याशी असलेल्या आत्मीय नात्याचा उल्लेख करत सांगितले की, “गेल्या २७ वर्षांपासून मी या भागातील आदिवासी बांधवांबरोबर दिवाळीसारखे सण साजरे केले आहेत. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन लोकांशी घट्ट नाते जोडले आहे. ही माझी खरी संपत्ती आहे.”
बैठकीत शहराध्यक्ष अॅड. अमर पाचपोर यांनी निवडणुकीच्या तयारीचा आढावा सादर केला. यावेळी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अविनाश उमरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुका काँग्रेस अध्यक्ष अॅड. भालेराव यांनी केले. संपूर्ण बैठकीदरम्यान “काँग्रेस विजय निश्चित!” असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये झळकत होता.








