Healthcare on the verge of collapse : एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कामबंद संप तीव्र

NHM contract employees’ on strike : सरकारवर दबाव वाढवण्यासाठी नेत्यांची हजेरी

Buldhana राज्यातील आरोग्यसेवा ठप्प होण्याच्या मार्गावर असून, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) कार्यरत ३६ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांनी १९ ऑगस्टपासून कामबंद आंदोलन छेडले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासन निर्णय निघूनही १८ महिने उलटले तरी शासकीय सेवेत समावेश न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.

राज्यातील ३६ जिल्हे आणि १८ महापालिकांमध्ये आंदोलन सुरू असून, बुलढाणा जिल्हा मुख्यालयी दररोज धरणे आंदोलन केले जात आहे. “शासनाने आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही,” असा इशारा राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रिकरण समिती व एकता संघाचे राज्य समन्वयक नितीन इंगळे यांनी दिला.

आरोग्याशी संबंधित विविध तांत्रिक व अतांत्रिक पदांवर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १४,५०० जणांनी दहा वर्षांची सेवा पूर्ण केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने १४ मार्च २०२४ रोजी शासन निर्णय जारी केला होता, मात्र आजतागायत अंमलबजावणी झालेली नाही.

Devendra Fadanvis : आमदार संदीप जोशींना मुख्यमंत्र्यांनी दिले सरप्राईज !

माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार धीरज लिंगाडे आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शवला. आमदार लिंगाडे यांनी “हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून मागणी पूर्ण करू,” असे आश्वासन दिले. तर शिंगणे व तुपकर यांनी शासनाला तातडीने निर्णय घेण्यासाठी भाग पाडण्याची ग्वाही दिली.

Nana Patole : आता अजित दादांनी बोलू नये, हेच बरं !

यापूर्वी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आंदोलनकर्त्यांसोबत बैठक घेत समायोजनाची हमी दिली होती. परंतु शासनाने आश्वासने पाळली नाहीत, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आता आरपार लढाईचे संकेत दिले आहेत. या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजणार हे निश्चित झाले आहे.