Heavy Rains : गांजा लागवड करू द्या, नाहीतर किडनी विकू द्या!

Angry farmers say, allow cultivation of cannabis : संतप्त शेतकऱ्यांची मागणी, सरकारच्या कारभारावर नाराजी

Jalgao Jamod सततच्या तोट्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांचा संताप अखेर उफाळून आला आहे. खेर्डा खुर्द व खेर्डा बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात “शेतीत गांजा लागवड करण्याची व स्वतःची किडनी विक्री करण्याची रितसर परवानगी द्यावी” अशी धक्कादायक मागणी केली आहे.

शेतकऱ्यांच्या या मागणीने केवळ तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. २०२४ चा पीकविमा मंजूर होऊन वर्ष उलटले तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा नाहीत. सोयाबीन व कापसाच्या हेक्टरी ५ हजार रुपये अनुदानाचा लाभ अजूनही शेतकऱ्यांना नाही.

Local Body Election : उद्धव ठाकरेंचे ९८ पदाधिकारी एकनाथ शिंदेंकडे!

मे २०२५ मध्ये अवकाळी पावसामुळे मका, ज्वारी, भुईमूग, कांदा यांसह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले; पण पंचनाम्यानंतरही अहवाल “निरंक” दाखवण्यात आला. गेल्या दोन महिन्यांच्या मुसळधार पावसामुळे कापसाची बोंडे सडून गळाली, तर सोयाबीनची शेंगा पोकळ राहिल्या.

“परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की आता पोट भरण्यासाठी आम्हाला गांजा लागवड करावी लागेल किंवा स्वतःच्या किडनी विक्रीला परवानगी द्यावी,” असे शेतकरी प्रवीण भोपळे, वासुदेव राजनकर, दिलीप भोपळे, महादेव वानखेडे, समाधान गिडे यांच्यासह गावकऱ्यांनी स्पष्ट केले.

Sanjay Gaikwad : शिंदेंचे आमदार म्हणतात, ‘उपऱ्या भाजपसोबत युती नाही’!

शेतकऱ्यांनी शासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “शेतकऱ्यांचा जीव गेला तरी शासनाला फरक पडत नाही,” असा आरोप केला. शासनाने पीकविमा व अनुदानाच्या थकबाकीची तत्काळ पूर्तता करावी, अन्यथा शेतकरी आत्मघातकी निर्णय घेण्यास भाग पाडले जातील, असा इशाराही देण्यात आला आहे.