Breaking

Illegal sand mining and transportation : लोकांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनीच टाकली धाड !

The District Collector took the initiative based on the complaints of the people : अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीला चपराक

Gondia तिरोडा तालुक्यातील नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतर, जिल्हाधिकारी प्रदीप नायर आणि जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी घोगरा व घाटकुरोडा येथील रेतीघाटांवर धाड घातली. या कारवाईमध्ये अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणारे रेती माफिया लक्ष्य करण्यात आले.

तिरोडा महसूल विभागाकडे अनेक नागरिकांनी रेतीघाटावरून 24 तास अवैधरीत्या रेतीचे उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र, महसूल व पोलिस विभागाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली. या तक्रारींवरून जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी संयुक्त कारवाई केली.
या धाडीत, तिरोडा महसूल विभागाचे तहसीलदार नारायण ठाकरे, नायब तहसीलदार मोहोरकर, तलाठी पटले, आनंद भुते, सुजित पवार, तलाठी कार्यालयातील लिपिक कुर्वे, ठाकरे आणि तिरोडा पोलिस निरीक्षक अमित वानखडे यांनी सहभाग घेतला. कारवाई दरम्यान सात पोकलेन, चार टिप्पर व पाच हजार ९५० ब्रास रेती जप्त करण्यात आली.

Beed Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीचा मोठा दावा

घाटकुरोडा येथे गट क्रमांक ४८५ आराजी ०.६२ हेक्टरमध्ये २० डिसेंबर २०२४ रोजी तहसीलदारांनी जप्त केलेला अवैध रेतीसाठा १५० ब्रास रेती साठ्यापासून ५० मीटर अंतरावर असलेले दोन पोकलेन मशीन जप्त करण्यात आले. घोगरा येथे गट क्रमांक ३०३ आरजी ०.६६ हेक्टरमध्ये रेतीसाठा परवाना धारक रेहान फारुक कुंदरवाला (रा. गोंदिया) याचा अवैध १५०० ब्रास रेतीसाठा, दोन पोकलेन व टिप्पर एमएच ३५-एजे ४५२१, एमएच ३५-एजे ४५११, एमएच ३५-४३२१, एमएच ३५-एजे हे जप्त करण्यात आले.

Nitin Gadkari : आमदार, खासदार येतात जातात; लक्षात राहतं ते काम !

या कारवाईमुळे महसूल विभागाला चांगलीच चपराक बसली आहे. कारण तालुकास्तरावरील अधिकारी-कर्मचारी रेतीच्या अवैध उत्खनन व वाहतुकीकडे दुर्लक्ष करीत असल्याने रेतीमाफिया गब्बर झाले होते. जिल्ह्यात घरफोडी-चोरीच्या घटना सातत्याने घडत असून, चोरटे पोलिसांच्या हाताबाहेर आहेत, यावरून जिल्हावासी जिल्हाधिकाऱ्यांकडून हस्तक्षेप करण्याची मागणी करू लागले आहेत.