व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Beed Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीचा मोठा दावा !

Beed Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीचा मोठा दावा !

 

Sarpanch Santosh Deshmukh’s wife’s big claim : वाल्मिक कराडच्या अडचणीत होणार वाढ

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात सतत नव्या घडामोडी पुढे येत आहेत. या प्रकरणात वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ होत आहे. तर संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी सीआयडीसमोर एक धक्कादायक दावा केला आहे.

संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासात संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्यात दोनदा फोनवर संवाद झाल्याचे समोर आले आहे. ६ डिसेंबर रोजी सुदर्शन घुलेने मस्साजोगला जाताना वाल्मिक कराडला फोन केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. संतोष देशमुख यांच्यासोबत झालेल्या बाचाबाचीनंतर पुन्हा एकदा सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांनी संवाद साधला होता.

Ravi Rana Bachhu Kadu : बच्चू-राणा भाऊ भाऊ… दोघे मिळून चहा पिऊ !

 

वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. वाल्मिक कराड सध्या पोलीस कोठडीत असून त्याची चौकशी सुरु आहे. या नवीन माहितीमुळे वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Cylinder black market : गॅस काढून विकला जातो सिलिंडर !

 

अश्विनी देशमुख यांचा धक्कादायक दावा
संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी सीआयडीसमोर एक महत्त्वाचा जबाब दिला आहे. त्यांनी सांगितले की संतोष देशमुख यांना महिनाभरापूर्वी वाल्मिक कराडची धमकी मिळाली होती. अश्विनी देशमुख यांनी सीआयडीला दिलेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये खळबळ निर्माण झाली होती.

वाशिममध्ये मूक मोर्चा
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ वाशिममध्ये मूक मोर्चा काढण्यात आला. सर्व राजकीय पक्षांच्यावतीने वाशिमच्या श्री शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चाला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख उपस्थित होते

error: Content is protected !!