Uddhav Thackeray’s Shivsena protested against the government : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामुळे शिवसेना (उबाठा) महिला आघाडीचे सरकारविरोधात आंदोलन
Buldhana पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही केंद्र सरकार बीसीसीआयला पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याची परवानगी देत असल्याच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या वतीने बुलढाणा शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले.
संगम चौकात घेण्यात आलेल्या या आंदोलनावेळी ‘माझं कुंकू, माझा देश’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला. जिल्ह्यातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या ‘दुटप्पी भूमिकेचा’ निषेध नोंदवून पाकिस्तानविरोधी संताप व्यक्त केला.
Relief for construction workers : बांधकाम कामगारांना दिलासा, आता चार उपकेंद्रांवर गृहोपयोगी संच वाटप
या आंदोलनाचे मार्गदर्शन शिवसेना प्रवक्ता अॅड. जयश्री शेळके यांनी केले. त्या म्हणाल्या, “ज्यांच्या हातून देशातील जवानांचा बळी जात आहे, अशा पाकिस्तानशी संबंध ठेवणे म्हणजे शहीदांचा अपमान आहे. बीसीसीआयला पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याची परवानगी देणे हे देशद्रोहाला प्रोत्साहन देणारे आहे.” आंदोलनावेळी महिलांनी प्रतीकात्मक स्वरूपात सरकारला कुंकू पाठवून आपला निषेध व्यक्त केला.
या प्रसंगी महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख विजया खडसान, उपजिल्हाप्रमुख प्रतीक्षा पिंपळे, तालुका संघटक रुपाली चौधरी, शहर प्रमुख लक्ष्मी बकटवार, रत्ना शेळके, अर्चना शेळके, गोदावरी काळे, कडुबाई भागिले, सुमनबाई रिंढे, शोभा रिंढे, ताराबाई रिंढे, दुर्गाबाई रिंढे, लताबाई रिंढे, ताराबाई खरे, अनुष्का जाधव, स्मिता वराडे, सोनाली वाघ, उषा साळोक, शालिनी जाधव आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्या उपस्थित होत्या.








