household appliance kits will now be distributed at four sub-centers : आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन हादरले, एकाच ठिकाणी व्हायची गर्दी
Amravati बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच मिळवण्यासाठी जिल्हाभरातून एका ठिकाणी गर्दी करावी लागत होती. त्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळ, गैरसोयी व असुविधांचा प्रश्न अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. आता चार उपकेंद्रांवर संचांचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे प्राथमिक संकेत मिळाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून बडनेरानजीक दाभा (ता. नांदगाव खंडेश्वर) येथे संचांचे वाटप केले जात होते. मात्र, अपुरे व्यवस्थापन, मूलभूत सुविधांचा अभाव, चिखलमय रस्ते आणि प्रचंड गर्दी यामुळे कामगारांना एका संचासाठी तब्बल १६ तास रांगेत थांबावे लागत होते. याची माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दखल घेत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी कामगार सहायक उपआयुक्तांना पत्राद्वारे इशारा देत, चार केंद्रांवर संचांचे वाटप सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता.
Anti curroption bureau: तहसीलदाराला दाेन लाखांची लाच घेताना पकडले, शंका येताच पैसे फेकले शाैचालयात
या इशाऱ्याचा प्रभाव प्रशासनावर दिसून आला असून, आता जिल्ह्यातील चार ठिकाणी उपकेंद्रांद्वारे गृहोपयोगी संच वाटपाची तयारी सुरू असल्याचे समजते. जरी याबाबत अद्याप अधिकृत आदेश आलेला नसला, तरी कामगारांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांच्या अपेक्षा आहेत की, पुढील काळात हे वाटप अधिक नियोजनबद्ध, सुरळीत आणि सुविधा उपलब्ध करून केले जाईल.
Rising Mining Activities : माओवाद आटोक्यात, पण पर्यावरणाचे काय ?
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही मुंबईला पत्रव्यवहार केला आहे. लवकरच वरिष्ठांमार्फत सूचना आल्यावर अमरावती जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या ठिकाणीही संच वाटप सुरू होईल. त्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याबाबत ठेकेदारांना सूचना दिल्या आहेत, असे सहायक उपायुक्त (कामगार) श्रद्धा वाघमारे यांनी सांगितले.








