Breaking

Irrigation Department : खारपाणपट्ट्यांना सिंचनाचा दिलासा; ४२६ कि.मी. कालव्याचे सर्वेक्षण पूर्ण

Irrigation relief for kharpanpatta : नदीजोड प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील स्टोरेजचेही सर्वेक्षण झाले

Akola वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला गती मिळाली असून, वैनगंगा ते नळगंगा या ४२६ किलोमीटर लांबीच्या कालव्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तसेच पहिल्या टप्प्यातील स्टोरेज (धरण) बांधकामासाठी आवश्यक असलेले सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे. विदर्भातील सात जिल्ह्यांना लाभदायक ठरणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे विशेषतः खारपाणपट्ट्यांना सिंचनाचा मोठा दिलासा मिळणार आहे.

८६ हजार कोटी रुपये खर्चाच्या या नदीजोड प्रकल्पामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम आणि बुलढाणा या जिल्ह्यांतील तीन लाख ७१ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यामुळे केवळ सिंचनच नव्हे तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. याशिवाय, या कालव्यातून सौरऊर्जा निर्मितीचाही समावेश आहे.

Heavy rain : पुढील काही तास आणखी जोरदार पाऊस !

७ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या बैठकीत सर्वेक्षणाच्या कामाचे आदेश देण्यात आले. त्यानुसार कालव्याचे सर्वेक्षण विविध प्रकारांनी – काही ठिकाणी पाईपलाईन, काही ठिकाणी बोगदा (टनेल) अशा स्वरूपात करण्यात आले. डिझाईन तयार झाल्यानंतर आवश्यकतेनुसार यात काही बदल होण्याची शक्यता आहे.

Buldhana administration : स्मशानभूमीची जागा गायब, मुंदेफळ येथील प्रकार

पहिल्या टप्प्यात गोसेखुर्द ते लोअर वर्धा या १६८ किमी अंतरात प्रस्तावित धरणांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात लोअर वर्धा ते काटेपूर्णा आणि तिसऱ्या टप्प्यात काटेपूर्णा ते नळगंगा स्टोरेजचे सर्वेक्षण लवकरच सुरू होणार आहे. तसेच, वाशीम जिल्हा आणि पैनगंगा प्रकल्पालाही या नदीजोड योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे काटेपूर्णा ते वाशीम आणि नळगंगा ते पैनगंगा दरम्यानच्या कालव्याचे सर्वेक्षण लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

Shakuntala Railway : “शकुंतला गाडी आहे, गरिबांची नाडी आहे!”

सर्वेक्षण व अन्वेषणाचे काम १३ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत कालवा व पहिल्या टप्प्यातील स्टोरेजचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून उर्वरित दोन टप्पे आणि अन्वेषणाचे काम अद्याप बाकी आहे. त्यामुळे संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी आणखी पाच महिने लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.