Jain Dharma Sabha : जन कल्याण पार्टीची स्थापना, पक्षचिन्ह कबूतर

Jain sage Nileshchandra Vijay’s new political announcement : जैन मुनी निलेशचंद्र विजय यांची नवी राजकीय घोषणा,

Mumbai : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कबूतरखाना विवादानंतर आज जैन समाजाकडून कबूतरांच्या आत्मशांतीसाठी धर्मसभा आयोजित करण्यात आली. या धर्मसभेत जैन साधू-संतांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. “कबुतरामुळे महायुतीचं सरकार जाईल,” असा थेट इशारा जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिला.

धर्मसभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत निलेश मुनी म्हणाले, “सरकारला माझा नाही, सनातन धर्माचा इशारा आहे. महाराष्ट्राचा मराठी माणूस कबूतरांना विरोध करत नाही, पण काही लोक कबूतरांच्या नावावर राजकारण करत आहेत. जैन समाज सर्वाधिक टॅक्स भरतो, पण आमचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही. आता आम्हीही आमची संघटना उभी करत आहोत. आमचे उमेदवार मुंबई महापालिकेत उभे राहतील.”

Local body election : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हलचालींना वेग !

यावेळी त्यांनी नव्या ‘जन कल्याण पार्टीची घोषणा केली. “आमच्या पक्षाचं चिन्ह कबूतर असेल. शिवसेनेत वाघ होता, आमचं चिन्ह कबूतर असेल. ही फक्त जैनांची नाही, तर गुजराती, मारवाडी समाजाची पार्टी आहे. आमच्या पक्षात चादर-फादर सोडून सर्वांना एन्ट्री आहे,” असं निलेश मुनी यांनी स्पष्ट केलं.

निलेश मुनी यांनी यावेळी राज्य सरकारवर आणि महायुतीवर तीव्र शब्दांत टीका केली. “कबुतरामुळे महायुतीचं सरकार जाईल. कांद्यामुळे काँग्रेसचं सरकार गेलं होतं, आता कबूतरांमुळे हे सरकार जाणार,” असं त्यांनी म्हटलं. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदेंवर निशाणा साधताना ते म्हणाले, “त्या ताई कोण हे मला माहीत नाही. एकनाथ शिंदेंनी त्यांना आवरावं, त्या बिचाऱ्या पागल झाल्या आहेत.”

Weather update : मान्सून राज्यातून परतला; आता ऑक्टोबर हीटचा तडाखा !

धर्मसभेत उपस्थित असलेल्या जैन मुनी कैवल्य रत्न महाराज यांनीही सरकारवर हल्लाबोल केला. “कबूतर हा शांततेचा प्राणी आहे. आमचा धर्म सांगतो दुसऱ्यासाठी मरायचं असेल तरी चालेल. रावणासमोर जटायू उभा राहिला होता, पक्षी किती महत्त्वाचा आहे हे त्यातून दिसतं. डॉक्टरांना मी मूर्ख मानतो एक-दोन जण मेल्याने काय होतं? दररोज माणसं मरतात, त्यांचा सरकार विचार करत नाही,” असं कैवल्य रत्न महाराज म्हणाले.

Government scheme : सुरू असलेल्या योजना कायम चालतात असं नाही !

यावेळी त्यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या गैरहजेरीवरूनही सरकारवर टीका केली. “लोढा आज धर्मसभेला आले नाहीत. हीच सरकारची मिलीभगत आहे,” असा आरोप कैवल्य रत्न महाराज यांनी केला.

कबूतरखान्याच्या प्रश्नावरून निर्माण झालेल्या वादात आता धर्म आणि राजकारण दोन्ही गुंतल्याने या नव्या ‘जन कल्याण पार्टी’च्या घोषणेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

____