Jishnu dev verma : त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल

jishnu-dev-verma-takes-oath-as-22nd-governor-of-maharashtra : मुख्य न्यायमूर्तींकडून शपथविधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन

Mumbai : त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून बुधवारी पदाची शपथ घेतली. मुंबईतील राजभवनाच्या लोकभवनातील दरबार सभागृहात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यात मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केल्याबाबतची अधिसूचना वाचून दाखवली. शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत आणि राज्यगीताने झाली तर कार्यक्रमाची सांगता पुन्हा राष्ट्रगीताने करण्यात आली. शपथविधीनंतर भारतीय नौदलाच्या तर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात आली.

Buldhana sports complex : निवडणुकीत मोठमोठ्या घोषणा, तरीही क्रीडा संकुलाचे ‘मैदान’ रिकामेच!

या सोहळ्यास विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पोलीस आयुक्त देवेन भारती आणि मुख्य राज्य शिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

जिष्णू देव वर्मा यांचा जन्म १५ ऑगस्ट १९५७ रोजी त्रिपुराची राजधानी आगरताळा येथे झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला आणि १९९० च्या दशकात भाजपा मध्ये प्रवेश करून सक्रिय राजकारण सुरू केले. त्रिपुरामध्ये डाव्या पक्षांचे दीर्घकाळ वर्चस्व असतानाही भाजपची संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. १९९६, १९९८ आणि १९९९ या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी त्रिपुरा ईस्ट मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.

MLA siddharth kharat : मेहकरच्या विकासासाठी आमदारांना कुणाची हवी साथ?

२०१८ मध्ये Tripura मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर जिष्णू देव वर्मा यांना राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. या काळात त्यांनी वित्त, ऊर्जा, नियोजन, पंचायत राज आणि ग्रामीण विकास यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची धुरा सांभाळली. २०१८ ते २०२३ या कालावधीत त्रिपुराच्या प्रशासनात त्यांची भूमिका प्रभावी मानली जाते. आर्थिक नियोजन, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा यावर त्यांनी विशेष भर दिला. केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून राज्याच्या विकासाला चालना देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे त्रिपुराच्या विकास प्रक्रियेत त्यांच्या नेतृत्वाची नोंद महत्त्वपूर्ण मानली जाते.