Khamgao APMC : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी श्रीकृष्ण टिकार!

Shrikrishna Tikar elected as the committee chairman : एकूण १८ पैकी १३ संचालकांची उपस्थितीत अविरोध निवड

Khamgao अविश्वास ठराव पारीत झालेल्या रिक्त झालेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी श्रीकृष्ण ऊर्फ पिंटू टिकार यांची अविरोध निवड झाली.

सुभाष पेसोडे यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव १४ नोव्हेंबरला मंजूर झाल्यानंतर नव्या सभापती निवडीची प्रक्रिया सुरू झाली होती. बाजार समिती सभापती निवडीसाठी टीएमसी यार्डातील सभागृहात सभा पार पडलीत्यानुसार, बुधवारी आयोजीत सभेला १८ पैकी १३ संचालकांनी उपस्थिती दर्शवित सभापतीची निवड पार पाडली. या सभेला पाच संचालक अनुपस्थित होते. सभापतिपदासाठी श्रीकृष्ण ऊर्फ पिंटू टिकार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी अविरोध निवड केली.

Local Body Elections : दोन उपमुख्यमंत्र्यांच्या पाच सभा; बुलढाण्यातील राजकारण तापले!

बाजार समिती संचालक अशोक हटकर, राजाराम काळणे, विनोद टिकार, गणेश माने, श्रीकृष्ण टिकार, वैशाली मुजुमले, मंगेश इंगळे, संघपाल जाधव, शांताराम पाटेखेडे, राजेश हेलोडे, सुलोचना वानखडे, सचिन वानखडे, संजय झुनझुनवालांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी काँग्रेस नेते ज्ञानेश्वर पाटील, स्वप्निल ठाकरे, विनोद टिकार, सुरेशसिंह तोमर, कृष्णा ठाकूर, राम मिश्रा, नगेंद्र रोहणकार हजर होते. सभेला माजी सभापती सुभाष पेसोडे, गणेश ताठे, किंमत कोकरे, प्रमोदकुमार चिंचोलकार, विलास इंगळे यांची अनुपस्थिती होती.