व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Local Body Elections : दोन उपमुख्यमंत्र्यांच्या पाच सभा; बुलढाण्यातील राजकारण तापले!

Local Body Elections : दोन उपमुख्यमंत्र्यांच्या पाच सभा; बुलढाण्यातील राजकारण तापले!

Five rallies by the two Deputy Chief Ministers in Buldhana : शिंदे-पवारांच्या शक्तीप्रदर्शनाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली

Buldhana पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पाच सभांमधून जनसंपर्काचा झंझावात निर्माण केला आहे. विकासाचा अजेंडा, विरोधकांवरील टीका आणि ‘आम्हाला ताकद द्या’ अशा हाकांनी दोन्ही गटांनी वातावरण तापवले आहे.

“विकासासाठी ताकद आमच्या मागे उभी करा,” असे आवाहन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन ठिकाणच्या सभांमध्ये वातावरण पेटवले. शिंदेसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभांना चांगलीच गर्दी उसळली. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आ. अब्दुल सत्तार, आ. संजय गायकवाड तसेच स्थानिक उमेदवार उपस्थित होते.

Eknath Shinde : कुणीही ‘लाल’ आला तरी ‘लाडकी’ योजना बंद होणार नाही

शिंदे म्हणाले, “मी पाच वेळा बुलढाण्यात आलोय. तुम्ही विधानसभेत मला भरभरून साथ दिलीत; आता रेकॉर्डब्रेक मतदान करा. विरोधक काय बोलतात त्याकडे लक्ष देऊ नका. आमचा उद्देश फक्त जनसेवा आहे.”

सभेच्या शेवटी शिंदे म्हणाले, “इलाका कुणाचाही असो, धमाका आम्हीच करतो!” या वक्तव्याने सभा जल्लोषात रंगली. मात्र हा इशारा नेमका कोणाला, यावर राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झाली आहे.

Local body election : मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढलं जातं !

सिंदखेडराजा एमआयडीसीचा निर्णय मार्गी लावणे, कृषी समृद्धी नवनगर–माळसावरगाव स्मार्ट सिटी प्रकल्पांना गती देणे, तसेच जिजाऊ–शिवराय स्मारक उभारण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. “सिंदखेडराजा जगाच्या नकाशावर यायला हवा,” असंही ते म्हणाले. सिंदखेडराजा तालुका ‘दत्तक’ घेतल्याची घोषणाही केली.

Local body election : निलेश राणेंचं स्टिंग ऑपरेशन; ‘हमाम में सब नंगे हैं’

अजित पवारांचा देऊळगाव राजा–चिखली–मलकापूर दौरा

दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन ठिकाणच्या सभांमधून विरोधकांवर जोरदार प्रहार करत स्वतःचा विकास अजेंडा मांडला. देऊळगाव राजामध्ये पवार म्हणाले, “इतका मोठा वारसा असूनही शहरांचा विकास मागे राहिला. वडिलोपार्जित सहकारी संस्था संभाळता न येणारे आता नवी तत्त्वनिष्ठा सांगतात. ही ढोंगीपणा आहे.”

error: Content is protected !!