व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Khamgao Congress : मार्गदर्शनाच्या आड ‘वर्चस्व’ची लढाई; खामगावात काँग्रेसमध्ये अंतर्गत कुरघोडी

Khamgao Congress : मार्गदर्शनाच्या आड ‘वर्चस्व’ची लढाई; खामगावात काँग्रेसमध्ये अंतर्गत कुरघोडी

Internal conflict in khamgao congress : नवख्यांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न; स्वार्थाचे राजकारण डोकावत असल्याचा आरोप,

Khamgao काँग्रेसच्या ‘सृजन’ अभियानाला राज्यभर गती मिळत असतानाच खामगावच्या स्थानिक राजकारणात या अभियानाभोवती नवे समीकरणे तयार होत असल्याचे चित्र समोर येत आहे. संघटन बळकट करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या आड स्वार्थाचे राजकारण डोकावत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

अभियानाच्या माध्यमातून पक्षात आघाडी मिळवण्यासाठी नेत्यांमध्ये चुरस वाढल्याचे दिसून येत आहे. काही स्थानिक नेते नवख्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याच्या नावाखाली स्वतःचा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका होत आहे. संघटनात्मक विस्ताराच्या प्रक्रियेत ‘मार्गदर्शक’ म्हणून पुढे येणारे हेच नेते पूर्वी वरिष्ठांच्या सूचनांवर काम करत होते, मग अचानक त्यांची भूमिका कशी बदलली, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Vijay Wadettiwar : भाजप म्हणजे महिला आरक्षणाची ‘सिरियल किलर’; विजय वडेट्टीवारांचा घणाघाती प्रहार!

या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत राजकीय गणिते अधिक गुंतागुंतीची होत असल्याचे संकेत मिळत आहेत. गत दशकात खामगावच्या राजकारणात झालेल्या बदलांमुळे पारंपरिक नेतृत्व अस्वस्थ झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. नव्या पिढीच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या नावाखाली जुन्या गटांमध्ये वर्चस्व टिकवण्याची धडपड सुरू असल्याचेही बोलले जात आहे.

अलीकडेच झालेल्या एका मेळाव्यात ही अंतर्गत अस्वस्थता प्रकर्षाने दिसून आली. व्यासपीठावर भाषणांची आतषबाजी झाली असली, तरी पडद्यामागे मतभेद आणि गटबाजीची छाया स्पष्ट जाणवत असल्याची चर्चा आहे. प्रत्येक गट स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असल्याने ‘सृजन’ अभियानाचा मूळ उद्देश काहीसा बाजूला पडत असल्याची टीकाही होत आहे.

trump-tariff : 166 अब्ज डॉलर्स परताव्याची प्रक्रिया सुरू, भारताला अप्रत्यक्ष फायद्याची शक्यता !

राजकीय विश्लेषकांच्या मते, अशा संघटनात्मक अभियानांच्या माध्यमातून नेतृत्वाची चाचपणी आणि पुढील राजकीय समीकरणांची आखणी केली जाते. त्यामुळे या हालचाली केवळ संघटन विस्तारापुरत्या मर्यादित नसून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शक्तीपरीक्षणाचाच भाग असल्याचे मानले जात आहे.

error: Content is protected !!