Investigation underway in ‘that’ farmer’s kidney sale case : ‘त्या’ शेतकऱ्याच्या किडनी विक्री प्रकरणात तपास सुरू
Chandrapur : नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील रोशन कुळे या शेतकऱ्याने सावकारांच्या तगाद्याला कंटाळून थेट कंबोडिया (नानपेन) येथे जाऊन किडनी विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलीस तपासाला वेग आला आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास करण्यासाठी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने दोन स्वतंत्र पथके गठित केली असून, किडनी विक्रीशी संबंधित प्रत्येक दावा, प्रत्येक टप्पा आणि प्रत्येक व्यवहाराचा बारकाईने फॅक्ट चेक केला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणात किडनी विक्रीपूर्वी झालेल्या वैद्यकीय तपासण्या, परदेश प्रवासाची प्रक्रिया, आर्थिक व्यवहार, मध्यस्थांची भूमिका आणि परदेशातील संपर्क यांचा तांत्रिक पद्धतीने तपास सुरू आहे. शेतकरी रोशन कुळे सध्या मानसिकदृष्ट्या प्रचंड तणावाखाली असून, त्यांची अवस्था स्थिर झाल्यानंतर संपूर्ण प्रकरणातील नेमकी कंबोडियाशी असलेली लिंक उघडकीस आणली जाईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठा मानसिक आघात झाला असून, पोलिसांकडून संवेदनशीलतेने चौकशी केली जात आहे.
Pragya Rajiv Satav : पक्ष सोडला पण राहुल – सोनिया गांधी माझ्यासाठी दैवत
दरम्यान, या प्रकरणामागील सावकारी जाचही तपासाच्या केंद्रस्थानी आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी रोशन कुळे यांनी आपली विविध वाहने तसेच साडेतीन एकर शेती विकल्याचे तपासात समोर आले आहे. यापैकी दीड एकर शेती अवैध सावकार प्रदीप बावनकुळे याने थेट आपल्या नावावर करून घेतल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हा खरेदी-विक्री व्यवहार १९ एप्रिल २०२२ रोजी नागभीड येथील सहायक निबंधक कार्यालयात नोंदविण्यात आला असून, त्याचा दस्त क्रमांक ३९३ असल्याची नोंद उपलब्ध आहे.
Municipal Corporation Election : सत्तास्थापनेसाठी ४४ हा ‘मॅजिक फिगर’!
सावकारी प्रकरणाचा स्वतंत्र तपास ब्रह्मपुरी पोलीस करत असून, आतापर्यंत अटकेत असलेल्या पाचही आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. पीडित शेतकऱ्याने आजवर अवैध सावकारांकडून नेमकी किती रक्कम घेतली, किती रक्कम परतफेड केली, पैसे कोणत्या स्वरूपात दिले, मालमत्ता विक्रीतून किती रक्कम गेली, तसेच व्यवहारांमध्ये कोण कोण सहभागी होते, याचा सविस्तर आर्थिक हिशेब पोलिस तपासत आहेत
BJP OBC wing : डॉ. रणजीत पाटलांचे काम केल्यामुळे डावलले, हा आरोप निराधार
किडनी विक्री प्रकरणाचा तपास आणि सावकारी प्रकरणाचा तपास हे दोन्ही स्वतंत्रपणे सुरू असले तरी, दोन्ही तपासांमध्ये परस्पर समन्वय ठेवला जात आहे. तपासातून जे निष्पन्न होईल, त्यानुसार पुढील गुन्हे दाखल करण्यात येतील, तसेच गरज भासल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवरील यंत्रणांशीही संपर्क साधला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, आता तपासातून आणखी कोणते गंभीर धागेदोरे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
__








