Kokate hit wicket : कोकाटे ही ‘हिट विकेट’, स्वतःच खड्ड्यात उडी मारली; योग्य वेळी केस बाहेर आली !

Sanjay Raut’s strong attack on Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंवर संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

Mumbai: शासकीय सदनिका मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या निकालानंतर कोकाटे यांच्याकडील क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास ही दोन्ही मंत्रीपदे काढून घेण्यात आली असून, यासंदर्भातील आदेश राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी बुधवारी रात्री उशिरा जारी केले. मात्र, कोकाटे यांचे मंत्रिपद पूर्णतः रद्द न करता त्यांना सध्या बिनखात्याचे मंत्री ठेवण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माणिकराव कोकाटे तसेच सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. कोकाटे ही ‘हिट विकेट’ असल्याचे सांगत त्यांनी स्वतःच खड्ड्यात उडी मारल्याचा टोला लगावला. ही केस नवी नसून योग्य वेळी ती बाहेर आली, असे म्हणत यामागे सत्तेतील रणनीती असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Claim of finding drugs : उपमुख्यमंत्र्यांच्या भावाच्या रिसॉर्टजवळ १४५ कोटींचे ड्रग्ज सापडल्याचा दावा !

संजय राऊत म्हणाले की, काहींना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. ज्या अध्यक्षांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत तडकाफडकी निर्णय घेतले, सुनील केदार यांच्या प्रकरणात त्वरित निर्णय घेतला, मग कोकाटे यांच्या बाबतीत विलंब का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ‘मूळ प्रत येऊ द्या’ असे सांगत असल्यावरूनही त्यांनी शंका व्यक्त केली. ड्रग्सचे रॅकेट फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचल्याचा आरोप करत, महाराष्ट्रात येणार असल्याचे सांगितले जाणारे उद्योग नेमके कोणते आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

यावेळी संजय राऊत यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावरही भाष्य केले. अमित शाह माणसं तोडण्यात पटाईत असल्याचे म्हणत, मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद मिळणे देवेंद्र फडणवीस यांना सोपे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मुंडे यांच्या समर्थनार्थ असलेल्या गुंडांच्या टोळ्या सहभागी असल्याचा आरोप करत, ती कारणे अद्याप संपलेली नाहीत, असा दावा त्यांनी केला. खटला सुरू असून वाल्मीक कराड अजूनही तुरुंगात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

फडणवीस मंत्रिमंडळातील दोन मंत्री भ्रष्टाचार आणि गुंडगिरीच्या आरोपांमुळे बाहेर पडल्याने हा सरकारला लागलेला काळीमा असल्याचे संजय राऊत म्हणाले. शिंदे गटातील अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप असून त्यांना तात्काळ बरखास्त केले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. पैशाच्या बॅगा, पैसे मोजतानाचे व्हिडिओ अशा अनेक बाबी समोर आल्या असतानाही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

Municipal election : नागपूर महापालिका निवडणुकीत ओबीसी आरक्षण दुबार मतदारांचा गुंता

देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्याने राजकीय खेळी करत असून शेवटचा घाव ‘मिंध्यांवर’च घालतील, असा दावा करत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा कोकाटे प्रकरणाचा उल्लेख केला. कोकाटे ही हिट विकेट असून त्यांनी स्वतःच आपला खेळ संपवला, असे म्हणत ही केस योग्य वेळी बाहेर आणण्यात फडणवीसांची कसब असल्याचे सूचक विधानही त्यांनी केले.