Koradi Power project : कोराडी वीज प्रकल्पात मोठा अनर्थ टळला, चार कामगार थोडक्यात बचावले

Four-Workers-Burned-Due-to-Hot-Steam-Leakage-at-koradi-Power-project : गरम वाफेच्या गळतीने कामगार भाजले, रुग्णालयात दाखल

Nagpur काटोल तालुक्यातील बारुद कंपनीत झालेल्या स्फोटाची घटना ताजी असतानाच आज कोराडी येथील औष्णिक विद्युत केंद्रात झालेल्‍या गरम वाफेच्या गळतीने चार कामगार थोडक्यात बचावले. सर्व कामगार भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहे. मात्र यामुळे पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

बुधवारी टर्बाईन मेंटेनन्स विभागातील हॉट पाइपलाइनमधून अचानक गरम वाफेच्या गळतीला सुरुवात झाली. येथे कार्यरत असलेल्या कामगार गरम वाफेच्या माऱ्याने जखमी झाले. मात्र ही गळती रोखण्यात तत्काळ यश आल्याने मोठी दुर्घटना टळली.

प्रकल्पातील टर्बाइन मेंटेनन्स विभागात नियमित तपासणी आणि देखभालीचे काम सुरू होते. या दरम्यान अचानक हॉट एअर पाइपलाइनमध्ये गळती निर्माण झाली. पाइपलाइनमधून उच्च तापमानाची गरम वाफ बाहेर पडू लागल्याने परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

ladki bahin yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठी पडताळणी मोहीम

गळती झालेल्‍या ठिकाणी रविंद्र नांदुरकर (वय ५०), विशाल कांबळे (वय ४०), राहुल केळकर (वय ३५) आणि शैलेश मेश्राम (वय ३५) हे कर्मचारी कार्यरत होते. गरम वाफेने त्यांचे हात आणि पाय भाजल्या गेले. कोराडी कॉलनीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यापैकी दोन कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

Euthanasia permission : १२ वर्षांपासून कोमात असलेल्या युवकाला निष्क्रिय इच्छामृत्यूची परवानगी

उर्वरित दोघांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे बारुद निर्माण करणाऱ्या झालेल्या कारखान्यात झालेल्या स्फोटात आतापर्यंत एकूण २३ कामगारांचा मृत्यू झाला आहे. स्फोटात गंभीर जखमी झालेल्या आणखी सहा कामगारांवर ऑरेंज सिटी इस्पितळात उपचार केले जात आहे. हे सर्व कामगार सुमारे ८० टक्के भाजले आहेत. त्या सर्वांची स्थिती नाजूक आहे. या प्रकरणी कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. विधानसभेतही सर्वच आमदारांनी या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे.