Koregaon land scam in Pune : ‘आधी लूट आणि मग कायदेशीर सूट’ राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्ला !

Congress leader Rahul Gandhi makes serious allegations against Narendra Modi government : हे सरकार दलित, शोषित, पिढीत, वंचितांच्या हक्कांवर गदा आणत आहे

New delhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. यावेळी अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्यावर जो जमीन घोटाळ्याचा आरोप झाला, त्यावरून गांधी यांनी मोदी सरकारला धारेवर धरले आहे. दलितांच्या हक्काची 1800 कोटी रुपयांची सरकारी जमीन केवळ 300 कोटी रुपयांना विकण्यात आल्याचा आरोप गांधी यांनी केला. ‘आधी लूट आणि मग त्याला कायदेशीर सूट’, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे.

एक्सवरून (ट्विटर) आरोप करताना राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रात दलितांसाठी राखीव असलेली 1800 कोटी रुपये किमतीची सरकारी जमीन मंत्र्याच्या मुलाला केवळ तीनशे रुपये विकण्यात आली. एवढेच नव्हे तर या व्यवहारातील स्टॅम्प ड्युटीही माफ करण्यात आली. मोदी सरकारला ना लोकशाहीची काळजी आहे, ना जनतेची ना दलितांच्या, वंचितांच्या हक्कांची. कारण हे सरकार वंचित आणि शोषितांच्या हक्कांवर डाका टाकणाऱ्या लुटारूंवर अवलंबून आहे.

Internal disputes in Congress : सपकाळ यांनी निरीक्षकांना पाठवून बैठकच अवैध ठरवली !

राहुल गांधी यांच्या या आरोपानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. त्यांनी आपल्या एक्स हँडलवर कोणत्या मंत्र्याच्या मुलगा आहे, हे स्पष्ट केले नसले, तरी या आरोपांचा संदर्भ अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्याशी संबंधित आहे. पुण्यातील कोरेगाव येथील जमीन प्रकरणाशी हा संबंध थेट जोडला जातो. या प्रकरणात काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात , शिवसेना नेते अंबादास दानवे या नेत्यांनीदेखील यापूर्वी गंभीर आरोप केलेले आहेत. आता राहुल गांधी यांच्या या भाष्यामुळे हा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे.

Munde-Jarange controversy : ‘त्याला डुकरासारखा उचलून नेतो’ वक्तव्यावरून पुन्हा उफाळला नवा वाद !

काँग्रेसकडून सातत्याने उपस्थित केल्या जाणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि उद्योगपतींशी असलेले संगनमत, याला आता आणखी एक धार मिळाल्याचे राजकीय जाणकार सांगतात. दरम्यान भाजपकडून अद्याप यावर अधिकृतपणे कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु राहुल गांधी मुद्दाम खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीवर आधारित राजकारण करत आहेत, असा दावा भाजपच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी केला. राहुल गांधींच्या या आरोपांमुळे महाराष्ट्रातच नव्हे तर केंद्राच्या पातळीवरही दलित आणि वंचित हितसंबंधाच्या राजकारणाला नवी दिशा मिळू शकते, असेही राजकीय जाणकार मानतात.