व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Internal disputes in Congress : सपकाळ यांनी निरीक्षकांना पाठवून बैठकच अवैध ठरवली...

Internal disputes in Congress : सपकाळ यांनी निरीक्षकांना पाठवून बैठकच अवैध ठरवली !

Congress state president Harshvardhan Sapkal sent observers and declared the meeting illegal : शिष्टाचाराचे उल्लंघन करत जिल्हाध्यक्षांनी बैठक घेतल्याचा आरोप

Nagpur : नागपूर जिल्हा काँग्रेसमध्ये निवडणुकीपूर्वीच अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा निवड समितीच्या बैठकीवर खुद्द प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीच आक्षेप घेतला. त्यांनी बैठकीत निरीक्षकांना पाठवले आणि निरीक्षकांनी बैठकीतच उपस्थित नेत्यांना तंबी दिली आणि ही बैठक अवैध आहे, असे सांगत बैठक सोडून निघून गेले. या घटनेमुळे नागपूर जिल्हा काँग्रेसमध्ये काहीसे गोंधळाचे आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाध्यक्ष अश्विन बस यांनी प्रदेश समितीच्या सदस्यांना आणि निरीक्षकांना न बोलवता, काहीही न कळवता थेट जिल्हा निवड समितीची बैठक आज (७ नोव्हेंबर) आयोजित केली होती. ही बैठक नागपुरात खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक आणि उपाध्यक्ष सुरेश भोयर यांच्या उपस्थितीत सुरू झाली. मात्र ही बैठक बोलावण्यापूर्वी प्रदेश नेतृत्वाला कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही, असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बाजूने सांगण्यात आले. पक्षाच्या शिष्टाचार आणि संघटनात्मक नियमांचे उल्लंघन केले असल्याचेही बैठकीला आलेल्या निरिक्षकांनी सांगितले.

Munde-Jarange controversy : ‘त्याला डुकरासारखा उचलून नेतो’ वक्तव्यावरून पुन्हा उफाळला नवा वाद !

ह्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तातडीने निरिक्षक माजी आमदार वीरेंद्र जगताप, अशोक बोबडे व उदय मेघे यांना नागपुरात पाठवले. निरीक्षकांनी बैठकीत उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला आणि जिल्हाध्यक्षांना तंबी दिली. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निरीक्षकांनी बैठकीदरम्यान स्पष्ट शब्दात सांगितले की, ही बैठक संघटनेच्या नियमांच्या विरोधात आहे आणि कदापि वैध ठरू शकत नाही. त्यानंतर निरिक्षक बैठक अवैध ठरवून निघून गेले. त्यामुळे बैठक अर्धवट अवस्थेतच गुंडाळण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर बैठक अजूनही सुरूच असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

Dhananjay Munde : मला राजकीय आणि सामाजिक जीवनातून संपवण्याचा षडयंत्र, मुंडेंचा प्रतिहल्ला !

काँग्रेसमध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अशा प्रकारच्या अंतर्गत वादांमुळे आणि हे वाद चव्हाट्यावर येत असल्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसतो आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते जिल्हा काँग्रेसमध्ये गटबाजी आणि शिष्टाचार भंगाची ही नवी उदाहरणे पक्षाच्या निवडणूक रणनीतीला अडथळा ठरू शकतात. सदर प्रकरणावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया कोणीही दिली नसली तरी प्रदेश काँग्रेसकडून जिल्हा नेतृत्वावर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

error: Content is protected !!