Laxman Hake : विखे पाटलाने बादलीभर पाण्यात जीव द्यावा !

OBC Leader Laxman Hake Attacks on Minister Radhakrishna Vikhe Patil : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा राधाकृष्ण विखे पाटलांवर हल्लाबोल

Nagpur : सकल ओबीसी समाजाने २ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गेल्या कित्येक दिवसांपासून समाजाची भूमिका स्पष्टपणे जाहीर केलेली आहे. दरम्यान समितीवर असलेले विखे पाटील मध्ये लुडबूड करत आहेत, हे योग्य नाही. मी पक्षीय मतभेद बाजुला ठेऊन या ओबीसी मोर्चात एक आंदोलक म्हणून सहभागी होण्यासाठी आलो आहे, असे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी सांगितले.

ओबीसी मोर्चात सहभागी होण्यासाठी आज (१० ऑक्टोबर) प्रा. हाके नागपुरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, २ सप्टेंबरचा जीआर काढण्यामध्ये ज्यांचा सहभाग होता, ते विखे पाटील म्हणाले की, हे प्रकरण आता न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे जीआर बदलवता येणार नाही. यावर प्रा. हाके म्हणाले, पहिले तर बिनापाण्याच्या खोल विहिरीत उडी मारायची अन् मग त्यातून बाहेर काढायला सांगायचे, असं काहीसं विखे पाटलांचे काम आहे. विखे पाटील नावाचा माणूस आता जरांगेंची भाषा बोलायला लागला आहे.

Municipal Corporation : आमदार प्रवीण दटके यांनी आणले सफाई कामगारांच्या जीवनात नवचैतन्य !

विखे पाटलांना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य नाही, संविदानाची तत्वे मान्य नाहीत, सामाजिक मागासलेपणे माहिती नाही, गावाच्या सरपंच पदापासून राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत गेलेला, साखर कारखान्यांवर वर्चस्व असलेला मराठा समाज जर या अलुत्या बलुत्या समाजाच्या आरक्षणात गेला, तर त्या अलुत्या बलुत्यांचं काय होईल, या स्पर्धेमध्ये तो टीकेल का, हे जर या वयोवृद्ध विखे पाटलाला कळत नसेल, तर त्याने बादलीभर पाण्यात उडी मारावी आणि जीव द्यावा. या विखे पाटलाची काही लायकी नाही. बिन बुडाचा लोटा आहे, असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी विखे पाटलांवर हल्ला चढवला.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी दिलेला शब्द पाळला, रेल्वे उड्डाण पुलासाठी ३१ कोटी मंजूर !

विखे परिवार काँग्रेसमध्ये असताना मंत्रीपदावर होता. शिवसेनेत गेल्यावर तेथेही त्यांच्याकडे मंत्रीपद होतंच. आता भाजपमध्ये आले तर येथेही ते मंत्रीपदावर आहेत. पण अहिल्यानगर जिल्ह्याच्या बाहेर त्यांना कुणीही ओळखत नाही आणि यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची स्वप्नं पडायला लागली आहेत. विखे पाटलांनी बोलताना तारतम्य बाळगावं, असा सल्लाही प्रा. हाके यांनी दिला आहे. साखर कारखाने आणि वायनरी चालवणाऱ्या विखे नावाच्या माणसाला सरकारने समितीची जबाबदारी दिली. त्यामुळे आता तर सरकारच्या बुद्धीचीच कीव येते, असेही हाके म्हणाले.