Legislative Council Election : इच्छुकांची यादी मोठी; दटकेंच्या जागेवर कुणाचा नंबर?

 

Who will be elected in place of Praveen Datke? : २७ मार्चला फैसला; विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Nagpur गेल्या काही वर्षांपासून आमदारकीची गाडी चुकलेल्या अनेक नेत्यांची भिस्त आता विधानपरिषदेवर आहे. राज्यातील पाच विधानपरिषद जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यात नागपुरात आमदार प्रवीण दटके यांच्याही जागेचा समावेश आहे. त्यामुळे इच्छुकांची यादीतून नेमका कुणाचा नंबर लागणार, याबाबत उत्सुकता लागलेली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांच्या विश्वासातील माजी महापौर संदीप जोशी Sandeep Joshi व माजी आमदार सुधाकर कोहळे Sudhakar Kohale यांची नावे सर्वाधिक चर्चेत आहेत. यासोबतच माजी महापौर दयाशंकर तिवारी Dayashankar Tiwari, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकरे Avinash Thakre व माजी नगरसेवक संदीप गवई Sandeep Gawai यांचाही इच्छुकांमध्ये समावेश आहे.

Dr. Pankaj Bhoyar : जिल्ह्यातील आठ शाळा होतील ‘मॉडर्न’!

यापैकी कुणाला विधान परिषदेत जाऊन आमदार होण्याची संधी मिळणार याची आता उत्सुकता आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महायुती व महाविकास आघाडीचा पहिल्यांदाच संख्याबळावरून आमना-सामना होणार आहे, हे विशेष.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेत विधानसभा सदस्यांकडून निवडून द्यावयाच्या पाच जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. आमशा पाडवी (अक्कलकुवा) , प्रवीण दटके (मध्य नागपूर), राजेश विटेकर (पाथरी), रमेश कराड (लातूर ग्रामीण), गोपीचंद पडळकर (जत) यांनी विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर विधान परिषद सदस्यत्वाचे राजीनामे दिले होते. या रिक्त झालेल्या जागांसाठी येत्या २७ मार्च रोजी निवडणूक होणार आहे.

विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता केवळ एकच जागा विरोधकांच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. इतर चारही जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकून येणार हे स्पष्ट आहे. यापैकी केवळ राजेश विटेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. उर्वरित सर्वजण भाजपचे आमदार आहेत.

Budget session : अनुशेष वाढला, विरोधकांचा आवाज कमी झाला!

संंदीप जोशींना संधी मिळणार काय?
विदर्भातून केवळ नागपुरातील प्रवीण दटके हे विधानपरिषदेत असताना मध्य नागपुरातून भाजपचे आमदार म्हणून निवडून आले. त्यांची मुदत मे २०२६ पर्यंत होती. नव्या आमदाराला केवळ एक वर्षाचा कालावधी मिळणार आहे. परंतु यासाठी अनेक इच्छुक आहेत. माजी महापौर संदीप जोशी व भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांची नावे आघाडीवर आहेत.

यापूर्वी संदीप जोशी यांनी दोनदा नागपूरचे महापौरपद भूषविले आहे. परंतु आमदारकीने त्यांना हुलकावणी दिली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली होती. परंतु काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी पश्चिम नागपूरसाठी मोर्चेबांधणी केली होती. परंतु तेथे सुधाकर कोहळे यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली.

Nitin Gadkari : गडकरींच्या तंबीनंतर धावपट्टीचे काम पूर्ण; 1 एप्रिलपासून २४ तास सेवा

सुधाकर कोहळे यांना एकदाच दक्षिण नागपूरचे आमदार होण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांच्या नावावर फुली मारली जात आहे. प्रवीण दटके ओबीसी समाजाचे असल्याने ओबीसी समाजाला प्रतिनिधीत्व देण्यात यावे, असा युक्तीवाद कोहळे समर्थकांकडून होण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजपच्या कोट्यातून एखादे अनपेक्षित नाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही.