व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Legislative election : सोमवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस; पोटे-देशमुखांच्या लढतीकडे लक्ष

Legislative election : सोमवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस; पोटे-देशमुखांच्या लढतीकडे लक्ष

Monday is the last day for filing nominations; attention on the contest between Pravin Pote and Harshjit Deshmukh : राजकीय घडामोडींना वेग, एबी फॉर्मच्या प्रतिक्षेत बसलेल्यांची धाकधुक वाढली

Amravati अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार (१ जून) हा अखेरचा दिवस आहे. दुपारी ३ वाजेपर्यंतच उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन अर्ज सादर करता येणार असल्याने शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोण-कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महायुतीकडून भाजपचे नेते तथा माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून ते सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, अकोला येथील शिवसेना (शिंदे गट) उपनेते गोपीकिसन बाजोरिया हेही नामांकन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महायुतीतील राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे.

Grampanchayat election : ग्रामपंचायत निवडणुकांची रंगत वाढणार; सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे हर्षजित देशमुख यांनी शनिवारीच नामांकन अर्ज दाखल केला आहे. मात्र, काँग्रेसकडून त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता कायम आहे. पक्षाच्या अधिकृत एबी फॉर्मकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अपक्षांच्या भूमिकेकडे लक्ष

या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची भूमिकाही महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ३९ इच्छुकांनी ७२ नामांकन अर्जांची उचल केली आहे. त्यापैकी किती जण प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरतात, हे आज स्पष्ट होणार आहे.

Chikhli APMC : चिखली बाजार समितीत सभापतीपदासाठी रस्सीखेच; राजकीय हालचालींना वेग

विशेष म्हणजे, आमदार रवी राणा यांचे समर्थक विनोद गुहे हेही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यांच्या भूमिकेमुळे निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुपारी ३ वाजेनंतर अर्ज दाखल प्रक्रियेला पूर्णविराम मिळाल्यानंतर निवडणुकीच्या अंतिम लढतीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

error: Content is protected !!