Tussle for the chairman’s post in Chikhli Agriculture Market Committee : सत्तासमीकरणांकडे लक्ष; अंतिम निर्णय राहुल बोंद्रे यांच्या भूमिकेवर?
Chikhli तालुक्यातील सहकार आणि स्थानिक राजकारणाचे महत्त्वाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापतीपदाच्या निवडीपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे. विद्यमान सभापती डॉ. संतोष वानखडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, बाजार समितीतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.
महाविकास आघाडीची बाजार समितीवरील सत्ता कायम राहण्याची शक्यता असली तरी सभापतीपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू झाली आहे. माजी सभापती विष्णू पाटील कुळसुंदर यांच्या पत्नी कमल कुळसुंदर, समाधान सुपेकर, समाधान परिहार, पांडुरंग भुतेकर तसेच राम जाधव यांच्या नावांचा संभाव्य दावेदारांमध्ये समावेश असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
MLA Sajid khan pathan : संघ कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार पठाण यांच्यासह सर्व संशयित निर्दोष
इच्छुक उमेदवारांनी संचालक, महाविकास आघाडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढवत आपापली भूमिका मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे सांगितले जात आहे. उपसभापतीपद हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्याकडे असल्याने सभापतीपद काँग्रेसशी संबंधित सदस्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








