Loan waiver : आताच्या आता कर्जमुक्ती करा, तातडीने हेक्टरी ५० हजार द्या !

Uddhav Thackeray on farmers’ issues; Warning to the government : उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर; सरकारला इशारा

Paithan : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील नांदर गावातून केली. येथे त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट संवाद साधला आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी ठाकरे यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दात निशाणा साधत “आताच्या आता कर्जमुक्ती करा, तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये द्या,” अशी मागणी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “मी कोणताही राजकीय प्रचार करायला आलो नाही. पण शेतकऱ्यांच्या दु:खाकडे दुर्लक्ष करता येत नाही. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी आम्ही नेते येतो, गुळ लावून जातो आणि पुन्हा जनतेला विसरतो. तुम्ही भोळेभाबडे आहात, स्वप्न दाखवलं की बळी पडता. पण यावेळी मी राजकारणासाठी नाही, वास्तव सांगण्यासाठी आलो आहे.”

Eknath Shinde : “एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री”

मराठवाड्यावर गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तींचे संकट सतत कोसळत असल्याचे ठाकरेंनी नमूद केले. “पाऊस थांबायचं नाव घेत नाही. मराठवाड्याने कधी एवढं मोठं संकट अनुभवलं नव्हतं. ज्येष्ठ शेतकऱ्यांनाही असं म्हणावं लागतंय की, एवढा पाऊस त्यांनी आयुष्यात पाहिला नाही. पिकं गेली, जमीन खरडली, खरीप हातातून गेला, आता रब्बी घेणार कसं?” असा सवाल ठाकरे यांनी केला.

ठाकरे म्हणाले, “मी मुख्यमंत्री असताना कोणतीही समिती नेमली नाही. थेट निर्णय घेतला आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजना राबवली. त्या योजनेमुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. पण आजचं सरकार फक्त अभ्यास करतंय. शेतकऱ्यांची सर्कलनिहाय माहिती त्यांच्या हातात आहे, तरीही काहीच निर्णय घेतला जात नाही. पॅकेज देतात, पण ते अर्धवट आणि दिशाभूल करणारे असते. ही थट्टा आहे.”

उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टी आणि पीकविमा या दोन्ही मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरले. “पीकविम्याचे पैसे कुणाला मिळाले? ज्यांनी भरला, त्यांनी हात वर करा. सरकार म्हणतं सर्वांना मदत करतोय, पण प्रत्यक्षात एकही शेतकरी समाधानी नाही. गेल्या आठवड्यात वाटलं काहीतरी होईल, पण पुन्हा मुख्यमंत्र्यांनी फक्त गुळ लावला,” असे टोले त्यांनी मारले.

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला जामीन मंजूर !

ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते थेट मैदानात उतरल्याने, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरे सरकारविरोधी जनआंदोलन उभं करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.