Sikandar Sheikh granted bail, associates have criminal background : सहकाऱ्यांची गुन्हेगारी पार्श्र्वभूमी, सिकंदरवर यापूर्वी एकही गुन्हा दाखल नाही
Nagpur : महाराष्ट्र केसरी किताबाचा मान पटकावलेला कुस्तीपटून सिकंदर शेखर यांना अखेर न्यायालयाडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. पंजाबमधील शस्त्र विक्री प्रकरणात त्याचे नाव आले होते. पण त्याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे न्यायालयासमोर स्पष्ट झाल्यानंतर हा दिलासा देणारा निर्णय देण्यात आला.
पंजाब पोलिसांनी अलीकडेच शस्त्र विक्रीच्या अवैध व्यवहाराबाबत तपास सुरू केला होता. या प्रकरणात शेखसोबत असलेल्या तिघा व्यक्तींची गुन्हेगारी पार्श्र्वभूमी असल्याचे निष्पन्न झाले. मात्र सिकंदर शेखच्या विरोधात अशा स्वरुपाचे कोणतेही पुरावे अथवा गुन्हेगारी नोंदी आढळल्या नाहीत. या बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने त्याला शर्तींवर जामीन मंजूर केला. सिकंदर शेख हे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील एक प्रख्यात नाव आहे.
MSEDCL Tariff Hike : वीज दरवाढीचा निर्णय रद्द, महानिर्मिती व महावितरणला मोठा धक्का !
सिकंदर शेखने राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवलेले आहे. महाराष्ट्र केसरीचा किताब त्याने आपल्या नावावर केला आहे. या प्रकरणामुळे क्रीडा जगतासह शेखच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती. सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र चौकशीत त्याचा शस्त्र विक्री व्यवहाराशी थेट संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयात सुनावणीदरम्यान त्याच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की, सिकंदर शेख हा एक नामांकित खेळाडू आहे. त्याची ओळख गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांशी योगायोगाने झाली. त्याचा गुन्ह्याशी काहीही संबंध नाही.
Local Body Elections : नागपूर महानगरपालिकेत जाती व महिला आरक्षणाचे समीकरण ठरणार निर्णायक !
न्यायालयानेही हा युक्तिवाद स्वीकारला. त्यानंतर शेखविरोधात कुठलेही ठोस पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे केवळ संशयाच्या आधारावर त्याला ताब्यात ठेवणे योग्य ठरणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. दरम्यान पंजाब पोलिसांनी शस्त्र विक्री प्रकरणाची सखोल चौकशी सुरूच ठेवली आहे. आरोपींच्या नेटवर्कचा मागोवा घेतला जात आहे. या चौकशीत काही नवे धागेदोरे मिळतील, अशी माहीती सूत्रांनी दिली आहे.








