Assembly-wise in-charges have been appointed : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी पदाधिकाऱ्यांची बैठक
Amravati जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून, काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. रविवारी काँग्रेस भवन येथे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुकाध्यक्ष, शहराध्यक्षांसह विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीस प्रमुख अतिथी म्हणून खासदार बळवंत वानखडे, नवनियुक्त जिल्हाप्रभारी सिद्धार्थ हत्तीअंबिरे, तसेच प्रदेश सरचिटणीस हरिभाऊ मोहोड उपस्थित होते. यावेळी संघटनात्मक कामकाजाचे पुनरावलोकन करण्यात आले तसेच निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा पुन्हा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर फडकविण्यासाठी ठोस रणनीती आखण्यात आली. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काँग्रेसची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.
जिल्हा काँग्रेसने प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी प्रभारी नियुक्त करून संघटनेला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या बैठकीला हरिभाऊ मोहोड, सुधाकर भारसाकळे, प्रमोद दाळु, महेंद्रसिंह गेलवार, किशोर देशमुख, नामदेव तनपुरे, अमित गावंडे, श्रीनिवास सूर्यवंशी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Relief for construction workers : बांधकाम कामगारांना दिलासा, आता चार उपकेंद्रांवर गृहोपयोगी संच वाटप
विधानसभानिहाय प्रभारी
धामणगाव रेल्वे – अक्षय राऊत (सचिव)
तिवसा – धनंजय देशमुख (बुलढाणा)
दर्यापूर – प्रशांत पाचडे (सचिव)
मेळघाट – संजीवनी बिऱ्हाडे (अकोला)
अचलपूर – संजय खाडे (सचिव)
वरुड-मोर्शी – जावेद अन्सारी (सचिव)








