Excitement in mud as soon as Ajitdada NCP gets nomination : अजितदादांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी मिळताच चिखलीत खळबळ
Chikhali : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली नगरपरिषद निवडणुकीत धक्कादायक घडामोडी समोर आल्या आहेत. पत्नीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या गंभीर आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेला काँग्रेसचा युवा शहराध्यक्ष विशाल उर्फ रिकी काकडे याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करताच शहरात मोठी खळबळ उडाली.
9 नोव्हेंबरला कौटुंबिक वाद आणि पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या संशयातून नमिता काकडे यांच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा चिखली पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून त्यांना अटक झाली असून ते अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.
Nitish Kumar : नितीश कुमार यांनी रचला नवा विक्रम; मोदींनी केले अभिनंदन !
तरीदेखील न्यायालयाच्या परवानगीने पोलीस संरक्षणातच त्यांनी प्रभाग 13 अ मधून राष्ट्रवादी अजित पवार घटा कडून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अचानक पक्ष बदलत राष्ट्रवादीकडे धाव घेतल्याने राजकीय वर्तुळासह नागरिकांमध्येही तीव्र चर्चा रंगली आहे.
Thombre vs Khandalkar : रुपाली ठोंबरेंची माधवी खंडाळकरांना अब्रुनुकसानीची नोटीस
गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीस उमेदवारी कशी देण्यात आली, याबद्दल नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत असून राष्ट्रवादी अजित पवार गटाची भूमिका काय असेल, याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.
नामनिर्देशनापासून मतदानापर्यंतचा कार्यक्रम जाहीर असताना या उमेदवारीमुळे चिखली नगरपरिषद निवडणुकीचा राजकीय माहोल आणखी तापण्याची चिन्हे आहेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
——————–








