BJP’s dominance over the post of Municipal council President in Amravati district : १२ पैकी ६ नगरपरिषदांवर भाजपचा झेंडा
Amravati जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, नगराध्यक्षपदावर भाजपने सर्वाधिक यश मिळवले आहे. जिल्ह्यातील एकूण १२ नगराध्यक्षपदांपैकी भाजपने ६ ठिकाणी विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले आहे. काँग्रेसने २, तर शिंदेसेना, शिवसेना (उबाठा), प्रहार जनशक्ती पक्ष आणि अपक्षांनी प्रत्येकी १ नगराध्यक्षपद पटकावले आहे.
जिल्ह्यातील विविध नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये विजयी ठरलेले नगराध्यक्ष पुढीलप्रमाणे —
वरूड नगरपरिषद : ईश्वर सलामे (भाजप)
मोर्शी नगरपरिषद : प्रतीक्षा गुल्हाने (शिंदेसेना)
धारणी नगरपंचायत : सुनील चौथमल (भाजप)
चिखलदरा नगरपरिषद : शेख अब्दूल शेख हैदर (काँग्रेस)
अचलपूर नगरपरिषद : रूपाली माथने (भाजप)
अंजनगाव सुर्जी नगरपरिषद : अविनाश गायगोले (भाजप)
दर्यापूर नगरपरिषद : मंदाकिनी भारसाकडे (काँग्रेस)
शेंदूरजना घाट नगरपरिषद : हरिभाऊ वरखडे (भाजप)
धामणगाव रेल्वे नगरपरिषद : अर्चना रोटे (भाजप)
Local body elections: अमरावतीत वंचित बहुजन आघाडीची दमदार एन्ट्री!
चांदूर रेल्वे नगरपरिषद : प्रियंका विश्वकर्मा (अपक्ष – आपलं चांदूर पॅनल)
नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत : प्राप्ती मारोटकर (शिवसेना – उबाठा)
चांदूर बाजार नगरपरिषद : मनीषा नांगलिया (प्रहार जनशक्ती पक्ष)
या निकालांमुळे अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची ताकद वाढल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र काही ठिकाणी अपक्ष आणि प्रादेशिक पक्षांनी दिलेला धक्का लक्षवेधी ठरला आहे. विशेषतः चांदूर रेल्वे येथे अपक्ष उमेदवार प्रियंका विश्वकर्मा यांच्या विजयामुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले आहे.
आगामी काळात जिल्ह्यातील विकासकामे, सत्तास्थापना आणि आघाड्यांच्या हालचालींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








